IPL 2026 Black Magic Controversy Dainik Gomantak
क्रीडा

VIDEO: मैदानात फटकेबाजी, गॅलरीत 'ब्लॅक मॅजिक'? चाहत्यानं लिंबू फिरवला अन् चेन्नईला पाजलं पाणी; ललित मोदीने विचारले गंभीर प्रश्न

IPL 2026 Black Magic Controversy: आयपीएल 2026 चा हंगाम केवळ मैदानातील चौकार-षटकारांसाठीच नाही, तर मैदानाबाहेर घडणाऱ्या अनाकलनीय घटनांमुळेही चर्चेत आला आहे.

Manish Jadhav

IPL 2026 Black Magic Controversy: आयपीएल 2026 चा हंगाम केवळ मैदानातील चौकार-षटकारांसाठीच नाही, तर मैदानाबाहेर घडणाऱ्या अनाकलनीय घटनांमुळेही चर्चेत आला आहे. शनिवार, 18 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स (CSK) यांच्यात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात एका चाहत्याने केलेल्या 'टोटक्याने' सर्वांचे लक्ष वेधून घेतले. सोशल मीडियावर या घटनेला 'काळी जादू' असे संबोधले जात असून खुद्द आयपीएलचे माजी चेअरमन ललित मोदी यांनी यावर प्रतिक्रिया दिल्याने वादाला तोंड फुटले.

या सामन्यात हैदराबादने विजयासाठी दिलेल्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईची स्थिती 17 व्या षटकात 154 वर 7 बाद अशी होती. क्रीजवर विस्फोटक फलंदाज शिवम दुबे फलंदाजी करत होता, तर हैदराबादकडून साकिब हुसेन गोलंदाजी करत होता. याच वेळी कॅमेरा गॅलरीत बसलेल्या एका हैदराबादच्या चाहत्याकडे वळला. तो चाहता हातात लिंबू धरुन काहीतरी पुटपुटताना दिसला. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, त्याने हा टोटका केल्याच्या पुढच्याच चेंडूवर शिवम दुबे क्लीन बोल्ड झाला. या एका विकेटने सामन्याचे पारडे पूर्णपणे हैदराबादच्या बाजूने झुकले आणि चेन्नईला 10 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. या घटनेचा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल झाला असून चाहत्यांमध्ये 'अघोरी शक्तीं'च्या वापरावरुन चर्चा सुरु झाली.

या सर्व प्रकारानंतर ललित मोदी यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला. मोदी यांनी 2011 च्या आयपीएल हंगामातील एका धक्कादायक घटनेचा उल्लेख केला. त्यांनी लिहिले की, एका संघाच्या मालकाने विरोधी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये जाऊन अशाच प्रकारे काळी जादू किंवा टोटका करण्याचा प्रयत्न केला होता. 2011 मध्येच त्यांनी पुराव्यांसह संबंधित मालकांना याबद्दल सावध केले होते. इतकेच नाही तर, ललित मोदी यांनी आगामी काळात एका फिल्म किंवा टीव्ही सीरिजच्या माध्यमातून अशा प्रकारच्या कृत्यांमध्ये सामील असलेल्या बड्या नावांचा पर्दाफाश करणार असल्याचेही संकेत दिले आहेत.

एकीकडे तंत्रज्ञान आणि रणनीतीच्या जोरावर खेळल्या जाणाऱ्या या आधुनिक क्रिकेट स्पर्धेत अशा प्रकारच्या अंधश्रद्धेचे दर्शन घडल्याने क्रीडा जगतातून संताप व्यक्त होत आहे. हैदराबादच्या त्या चाहत्याने केलेले कृत्य हा निव्वळ योगायोग होता की त्यामागे खरंच काही 'टोटका' होता, हे सांगणे कठीण असले तरी, ललित मोदींच्या दाव्यामुळे आयपीएलमधील पडद्यामागच्या या काळ्या बाजूची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली. या पराभवामुळे चेन्नईच्या चाहत्यांमध्ये नाराजी असून सोशल मीडियावर (Social Media) 'ब्लॅक मॅजिक' विरुद्ध 'स्पिरिट ऑफ क्रिकेट' असा नवा वाद रंगला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT