IPL Auction
IPL Auction  Dainik Gomantak
क्रीडा

IPL-2024 चा ऑक्शन भारतात नाही तर 'या' ठिकाणी होणार, तारीखही जाहीर

Manish Jadhav

IPL-2024 Auction: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग म्हणजेच IPL (IPL-2024) च्या पुढील हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव भारतात होणार नाही. याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. लिलावाची तारीखही निश्चित झाली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्रांनी ही माहिती दिली. लिलावात लीगचे सर्व 10 संघ सहभागी होतील.

लिलाव भारतात होणार नाही

दरम्यान, ODI वर्ल्ड कप (ODI World Cup-2023) सध्या भारताच्या (India) यजमानपदी खेळवला जात आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान, IPL-2024 च्या लिलावाबाबत मोठी बातमी समोर आली आहे.

यावेळी IPLचा लिलाव भारतात नसून दुबईत होणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, 'आता 10 संघ आयपीएल लिलावात सहभागी होतील.

फ्रँचायझी सदस्य, बीसीसीआयचे अधिकारी, ऑपरेशन्स टीम, ब्रॉडकास्टर्स बसू शकतील अशा 5 स्टार हॉटेल्समध्ये शेकडो रुम मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळे दुबई हे ठिकाण लिलावासाठी निवडण्यात आले आहे.'

तारीख देखील निश्चित

त्यासाठीची तारीखही निश्चित करण्यात आली आहे. बीसीसीआयच्या (BCCI) अधिकाऱ्याने सांगितले की, इंडियन प्रीमियर लीगच्या 2024 हंगामासाठी लिलाव 19 डिसेंबर रोजी होणार आहे. दुबईत त्याचे आयोजन करण्यात येणार आहे.

लिलावादरम्यान, प्रत्येक संघाकडे 2024 हंगामासाठी 100 कोटी रुपये असतील, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 5 कोटी रुपये जास्त आहे. तर महिला प्रीमियर लीगचा लिलाव 9 डिसेंबर रोजी होणार आहे.

चेन्नई आणि मुंबई संघावर सर्वांच्या नजरा

चेन्नई सुपर किंग्जने गेल्या मोसमाच्या अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव करुन विजेतेपद पटकावले होते. चेन्नई आणि मुंबई इंडियन्सने 5-5 वेळा आयपीएलची चमकदार ट्रॉफी जिंकली आहे.

दोघांचे कर्णधारपदही भारतीय दिग्गजांकडे आहे. चेन्नईचे नेतृत्व महान यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकडे आहे तर मुंबईचे नेतृत्व दमदार सलामीवीर आणि भारतीय कर्णधार रोहित शर्माकडे आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: खनिज वाहतुकीचा अडसर दूर..!

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

Assagao House Demolition Case: पूजा शर्माच्या अटकपूर्व जामीन अर्जावर बुधवारी 'फैसला'; सरकारी वकिलांचा युक्तीवाद पूर्ण!

Goa Road Issue: बेतोडा-निरंकाल रस्त्याची दुर्दशा, अपघाताला निमंत्रण; दुरुस्तीची मागणी

Goa Rain Update: फोंड्यात पावसाचे 'धूमशान'! सप्तकोटेश्वर मंदिरात शिरले पाणी; महादेवाचे मंदिरही पाण्यात बुडाले

SCROLL FOR NEXT