MS Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

MS Dhoni: 'तरीही मला तो पुरस्कार देत नाहीत...', धोनीनं बोलून दाखवली मनातली खंत

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध यष्टीमागे दमदार कामगिरी केली, याबद्दल बोलताना त्याने गमतीने त्याच्या मनातील सलही बोलून दाखवली.

Pranali Kodre

MS Dhoni on his Wicket-Keeping: शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनीने यष्टीरक्षण करतानाही शानदार कामगिरी केली. त्याच्या या कामगिरीबद्दल त्याने सामन्यानंतर गमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे.

या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद प्रथम फलंदाजी करत असताना एमएस धोनीने एडेन मार्करसचा महिश तिक्षणाच्या गोलंदाजीवर यष्टीमागे शानदार झेल घेतला. तसेच त्याने मयंक अगरवालला रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीवर चपळाईने यष्टीचीत केले. याशिवाय त्याने डावाच्या अखेरच्या चेंडूवर वॉशिंग्टन सुंदरला धावबादही केले.

41 वर्षीय धोनीने यष्टीमागे केलेल्या या शानदार कामगिरीबद्दल सामन्यानंतर झालेल्या प्रेझेंटेशन दरम्यान हर्षा भोगले यांनी धोनीला प्रश्न विचारला. यावेळी धोनीने काहीशा गमतीने उत्तर देत सांगितले की 'तरीही ते मला सर्वोत्तम झेलचा पुरस्कार देत नाहीत. मी खूप चूकीच्या ठिकाणी उभा होतो. फक्त आम्ही ग्लव्ह्ज घातलो, म्हणून लोकांना वाटते ते खूप सोपे आहे. पण मला वाटते तो एक शानदार झेल होता.'

'खूप वर्षांपूर्वी मला एक सामना आठवतो. राहुल द्रविड त्यावेळी यष्टीरक्षण करत होता. तेव्हा राहुल भाईने अशा प्रकारे झेल घेतलेला. जेव्हा तुमचे वय वाढत जाते, तसतसे तुम्हाला अनुभव मिळत जातो. अपवाद सचिन पाजींचा आहे, ज्यांनी 16-17 व्या वर्षी खेळायला सुरुवात करता.'

तसेच हर्षा यांनी धोनीला तो 41 व्या वर्षीही यष्टीमागे करत असलेल्या कामगिरीबद्दल त्याचे कौतुक केले, तेव्हा धोनी म्हणाला, 'माझे नक्कीच आता वय झाले आहे, तुमचे वय तुम्ही नाकारू शकत नाही.'

दरम्यान, या सामन्यात सीएसकेचा युवा क्रिकेटपटू ऋतुराज गायकवाडने हॅरी ब्रुक आणि हन्रिक क्लासेन यांचे झेल घेतले होते. त्यामुळे त्याला या सामन्यातील सर्वोत्तम झेलाचा पुरस्कार त्याला देण्यात आला होता.

धोनीच्या नावावर विक्रम

एमएस धोनीने टी20 क्रिकेटमध्ये यष्टीमागे सर्वाधिक झेल घेण्याचाही विक्रम केला आहे. त्याने क्विंटन डी कॉकच्या 207 झेलांच्या विक्रमाला मागे टाकले आहे. धोनीचे आता यष्टीमागे 208 झेल घेतले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Coconut Prices: नारळाचे उत्पादन घटले, पण दर वाढलेले नाहीत! '50-60 रुपयांच्या अफवांवर विश्वास ठेवू नका'

Nepal Flood: नदीचं खवळलेलं पाणी, पूल तुटण्याच्या मार्गावर... समोर मृत्यू दिसत असतानाही कुटुंबासाठी धावला 'बाप' Watch Video

Stray Cattle: शिवोलीत भटक्या गुरांचा उपद्रव वाढला; मुख्य रस्त्यावर ठाण, छोटे-मोठे अपघात नित्याचे, वाहनचालक त्रस्त

Goa Cashew: काजूच्या बागा वाढल्या, पण उत्पादन घटले! 7 वर्षांत तब्बल 3,683 टनांची घट; यंदा अवघी 65 टनांची वाढ

Goa Delhi Indigo Flight: मोठा अनर्थ टळला! उड्डाणानंतर इंडिगो विमानाचे इंजिन अचानक फेल; मोपा एअरपोर्टवर इमर्जन्सी लँडिंग, सर्व प्रवासी सुरक्षित

SCROLL FOR NEXT