PBKS vs DC Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: पंजाब प्लेऑफकडे आगेकुच करणार की दिल्ली बनणार व्हिलन? पाहा दोन्ही टीमचे Playing XI

PBKS vs DC: धरमशालामध्ये पहिला IPL 2023 सामना खेळण्यासाठी पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघ सज्ज आहेत.

Pranali Kodre

Punjab Kings vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात सामना होत आहे. हा सामना पंजाबचा घरचा सामना असून धरमशालामधील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणार आहे. धरमशालामधील हा आयपीएल 2023 मधील पहिला सामना आहे.

या सामन्यात पंजाबचा कर्णधार शिखर धवनने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सामन्यासाठी पंजाबने दोन बदल केले आहेत. त्यांच्या संघात अथर्व तायडे आणि कागिसो रबाडा यांचे पुनरागमन झाले आहेत. तसेच दिल्ली संघात पृथ्वी शॉ याचे पुनरागमन झाले आहे. याशिवाय दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने माहिती दिली आहे की मिचेल मार्शला दुखापत झाल्याने तो खेळणार नाही.

या सामन्यासाठी पंजाबने प्लेइंग इलेव्हनमध्ये लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, कागिसो रबाडा आणि नॅथन एलिस या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे, तर दिल्लीने कर्णधार डेव्हिड वॉर्नरसह फिलिप सॉल्ट, रिकी रोसौ आणि एन्रिक नॉर्किया या परदेशी खेळाडूंना संधी दिली आहे.

त्यामुळे दोन्ही संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये प्रत्येकी 4 परदेशी खेळाडू असल्याने इम्पॅक्ट प्लेअर म्हणून दोन्ही संघांना केवळ भारतीय खेळाडूलाच वापरता येणार आहे.

इम्पॅक्ट प्लेअरच्या पर्यायांसाठी दिल्लीने राखीव खेळाडूंमध्ये मुकेश कुमार, अभिषेक पोरेल, रिपल पटेल, प्रविण दुबे आणि सर्फराज खान यांना निवडले आहे. तसेच पंजाबने राखीव खेळाडूंमध्ये प्रभसिमरन सिंग, सिकंदर रझा, मॅथ्यू शॉर्ट, ऋषी धवन आणि मोहित राठी यांना संधी दिली आहे.

हा सामना पंजाबसाठी प्लेऑफच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. त्यांना या सामन्यात विजय गरजेचा आहे. जर या सामन्यात पराभव झाला, तर पंजाबच्या प्लेऑफच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो. तसेच दिल्लीचे मात्र आव्हान यापूर्वीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे ते केवळ ही स्पर्धा आता विजयी लयीत संपवण्याच्या इराद्याने मैदानात उतरतील.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

  • पंजाब किंग्स - शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करन, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, राहुल चाहर, कागिसो रबाडा, नॅथन एलिस, अर्शदीप सिंग

  • दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), रिली रौसो, अक्षर पटेल, अमन हकीम खान, यश धुल, कुलदीप यादव, एन्रिक नॉर्किया, इशांत शर्मा, खलील अहमद

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT