Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: कॅप्टन कूल रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरणार जगातील पहिला कर्णधार!

IPL 2023, CSK vs RR: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे.

Manish Jadhav

IPL 2023, CSK vs RR: भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे. धोनी आज, (बुधवारी) चेपॉक येथे राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रवेश करेल, तेव्हा तो आयपीएलच्या इतिहासात एक मोठा विक्रम करेल.

राजस्थान रॉयल्सविरुद्धचा हा सामना महेंद्रसिंग धोनीसाठी खूप खास असेल. खरेतर, महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार म्हणून 200 वा आयपीएल सामना खेळणार आहे.

महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर आहे

चेन्नई सुपर किंग्जचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) सांगितले की, 'मला विजयाचा आनंद साजरा करायला आवडेल. बुधवारी येथे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सामन्यात महेंद्रसिंग धोनी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार म्हणून 200 वा सामना खेळणार आहे.'

तसेच, चार वेळा आयपीएल चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचा संघ बुधवारी चेपॉक मैदानावर आयपीएलच्या पहिल्या हंगामातील चॅम्पियन राजस्थान रॉयल्सशी (Rajasthan Royals) भिडणार आहे.

चेन्नईचा कर्णधार म्हणून धोनीचा हा 200 वा सामना असेल. जडेजा सामन्यापूर्वी म्हणाला की, 'मी काय बोलू. तो केवळ चेन्नई सुपर किंग्जचाच नाही तर भारतीय क्रिकेट जगताचा एक दिग्गज आहे. मी त्याला शुभेच्छा देऊ इच्छितो.'

जडेजा पुढे म्हणाला की, 'आशा आहे, आजचा सामना आम्ही जिंकू. कर्णधार म्हणून 200 व्या सामन्यात धोनीला विजयाची भेट देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. आशा आहे की, गेल्या दोन सामन्यांमध्ये आम्ही ज्या प्रकारे खेळलो, ती लय कायम ठेवू.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT