Ajinkya Rahane Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: रहाणेने CSK साठी फक्त फिफ्टीच मारली नाही, तर 'हे' 3 मोठे विक्रमही केले नावावर

अजिंक्य रहाणेने 8 एप्रिलला चेन्नई सुपर किंग्सकडून पदार्पण करताना मुंबई इंडियन्सविरुद्ध तुफानी अर्धशतक ठोकत काही विक्रमांनाही गवसणी घातली आहे.

Pranali Kodre

Ajinkya Rahane Fastest Fifty: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेच्या 12 व्या सामन्यात शनिवारी (8 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला 7 विकेट्सने पराभूत केले. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात अजिंक्य रहाणेने तुफानी अर्धशतक करत सीएसकेच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. याबरोबरच रहाणेने काही विक्रमही आपल्या नावावर केले आहेत.

या सामन्यात मुंबईने सीएसकेसमोर विजयासाठी 158 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून पहिलाच सामना खेळणाऱ्या अजिंक्य रहाणेने आक्रमक फलंदाजी करत 19 चेंडूतच अर्धशतक झळकावले.

दरम्यान त्याने डावाच्या चौथ्या षटकात अर्शद खान विरुद्ध एक षटकार आणि चार सलग चौकार ठोकत एकूण 23 धावाही काढल्या होत्या. त्याने या सामन्यात एकूण  27 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 61 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे सीएसकेला 18.1 षटकातच सामना जिंकणे सोपे गेले.

दरम्यान, रहाणे हा यंदाच्या आयपीएल हंगामात सर्वात जलद अर्धशतक करणारा फलंदाजही बनला आहे. त्याने जोस बटलर आणि शार्दुल ठाकूर यांच्या 20 चेंडूत अर्धशतक करण्याच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

मुंबई इंडियन्सविरुद्ध जलद अर्धशतक

तसेच मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या पहिल्या तीन फलंदाजांच्या यादीतही रहाणने स्थान मिळवले आहे. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध सर्वात जलद अर्धशतक करणाऱ्या फलंदाजांमध्ये तिसऱ्या क्रमांकावर आला आहे.

या यादीत अव्वल क्रमांकावर असलेल्या पॅट कमिन्सने गेल्यावर्षी पुण्यात झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 14 चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच 2019 साली मुंबईत झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सविरुद्ध 18 चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

सीएसकेकडून सर्वात जलद अर्धशतक

रहाणेने सीएसकेकडून आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज ठरला आहे. त्याने या यादीत दुसऱ्या क्रमांकावरील मोईन अलीची बरोबरी केली आहे. मोईन अलीने गेल्यावर्षी राजस्थान रॉयल्सविरुद्ध ब्रेबॉर्नला झालेल्या सामन्यात 19 चेंडूत अर्धशतक केले होते. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर असेलल्या सुरेश रैनाने मुंबईत पंजाब किंग्सविरुद्ध २०१४ साली १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.

सीएसकेसाठी आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक

16 चेंडू - सुरेश रैना (विरुद्ध पंजाब किंग्स, 2014)

19 चेंडू - अजिंक्य रहाणे (विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2023)

19 चेंडू - मोईन अली (विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 2022)

20 चेंडू - एमएस धोनी (विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2012)

20 चेंडू - अंबाती रायुडू (विरुद्ध मुंबई इंडियन्स, 2022)

हे माहिती आहे का?

आयपीएलमध्ये एका षटकात सलग 6 चौकार मारणारा पहिला फलंदाज अजिंक्य रहाणे आहे. त्याने 2012 साली राजस्थान रॉयल्सकडून खेळताना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याने राजस्थानच्या डावातील 14 व्या षटकात श्रीनाथ अरविंदच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत 6 चौकार मारण्याचा पराक्रम केला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT