MI vs CSK memes Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'हिल गयी दुनिया?', MI vs CSK मॅच नंतर भन्नाट मीम्सचा सुळसुळाट

शनिवारी चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला आयपीएल 2023 मधील सामन्यात पराभूत केल्यानंतर सोशल मीडियावर भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत.

Pranali Kodre

Memes Viral After MI vs CSK Match: मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे संघ इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या हंगामात शनिवारी (8 एप्रिल) आमने-सामने आले होते. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात एमएस धोनीच्या नेतृत्वातील सीएसकेने 7 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

खरंतर हे दोन संघ आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असून एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून ओळखले जातात. त्यामुळे अनेकदा या दोन संघांच्या चाहत्यांमध्ये फॅनवॉरही रंगते. सोशल मीडियावर तर या दोन संघांच्या सामन्यावेळी अनेक मीम्सही व्हायरल होत असतात. याचप्रमाणे शनिवारच्या सामन्यानंतरही बरेच भन्नाट मीम्स व्हायरल झाले होते.

या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 157 धावा केल्या होत्या. मुंबईकडून ईशान किशनने 32 आणि टीम डेव्हिडने 31 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त कोणालाही 30 धावांचा टप्पा ओलांडता आला नाही. सीएसकेकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या आणि मिचेल सँटेनरने 2 विकेट्स घेतल्या.

त्यानंतर मुंबईने दिलेल्या 158 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून अजिंक्य रहाणेने 27 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली, त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड 40 धावांवर नाबाद राहिला. सीएसकेने 18.1 षटकात 3 बाद 159 धावा करत हा सामना सहज जिंकला. मुंबईकडून जेसन बेऱ्हेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय आणि पीयुष चावला यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

सध्या आयपीएलमधील 12 सामन्यांनंतर सीएसके 4 गुणांसह गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर आले आहेत, तर मुंबईचे अद्याप गुणांचे खाते उघडलेले नाही, पण मुंबई आठव्या क्रमांकावर आहेत.

मुंबई-सीएसकेमध्ये 1000 वा आयपीएल सामना

आयपीएलच्या 16 व्या हंगामात सीएसके आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 6 मे रोजी दुसरा सामना चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर रंगणार आहे. विशेष म्हणजे हा आयपीएलच्या इतिहासातील 1000 वा सामना असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT