Delhi Capitals Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023, LSG vs DC: पंतच्या जागेवर 'हा' खेळाडू करणार विकेटकिपिंग! पाहा दिल्ली-लखनऊची Playing XI

आयपीएल 2023 स्पर्धेतील तिसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होणार आहे.

Pranali Kodre

Lucknow Super Giants vs Delhi Capitals: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेतील पहिला डबल हेडर (एका दिवसात दोन सामने) शनिवारी खेळला जात आहे. या दिवसातील दुसरा सामना लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात होत आहे.

लखनऊच्या घरच्या मैदानात म्हणजेच भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्यण घेतला आहे.

दरम्यान, या हंगामात दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतच्या अनुपस्थितीत खेळणार आहे. पंत सध्या कार अपघातात झालेल्या दुखापतीतून सावरत आहे. त्याच्या जागेवर डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व करत आहे. तसेच सर्फराज खान यष्टीरक्षण करताना दिसणार आहे.

या सामन्यासाठी दिल्लीने वॉर्नर व्यतिरिक्त मिचेल मार्श, रिली रोसौ आणि रोवमन पॉवेल या परदेशी खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली आहे. त्याचबरोबर लखनऊने काइल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, निकोलस पूरन आणि मार्क वुड यांना संधी दिली आहे.

असे आहेत प्लेइंग इलेव्हन

दिल्ली कॅपिटल्स - डेव्हिड वॉर्नर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मिचेल मार्श, रिली रोसौ, सरफराज खान (यष्टीरक्षक), रोवमन पॉवेल, अक्षर पटेल, कुलदीप यादव, चेतन साकारिया, खलील अहमद, मुकेश कुमार

लखनऊ सुपर जायंट्स - केएल राहुल (कर्णधार), काइल मेयर्स, मार्कस स्टॉयनिस, दीपक हुडा, कृणाल पंड्या, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), आयुष बडोनी, मार्क वुड, जयदेव उनाडकट, रवी बिश्नोई, आवेश खान

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT