Kyle Mayers  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'या' स्टार खेळाडूने केला शानदार रेकॉर्ड, जो आजपर्यंत कोणताही फलंदाज...

IPL 2023: आयपीएल 2023 ची सुरुवात विजयाने करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएल 2023 ची सुरुवात विजयाने करणाऱ्या लखनऊ सुपर जायंट्सला दुसऱ्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

लखनऊने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 50 धावांनी मोठा विजय नोंदवला, तर दुसऱ्या सामन्यात, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या रोमहर्षक सामन्यात त्यांना 12 धावांनी पराभव पत्करावा लागला.

दरम्यान, लखनऊ आता 7 एप्रिलला हैदराबाद विरुद्ध आपला पुढचा सामना खेळणार आहे. अशा परिस्थितीत त्यांची गाडी पुन्हा एकदा विजयी रुळावर येईल, अशी आशा संघाच्या चाहत्यांना असेल.

लखनऊला विजयानंतर पराभवाची चव चाखावी लागली असली तरी या दोन्ही सामन्यांमध्ये संघाचा सलामीवीर काईल मेयर्सने ज्या प्रकारची कामगिरी बजावली, त्यामुळे संघ व्यवस्थापन आणि चाहते नक्कीच खूश असतील.

दुसरीकडे, दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध (Delhi Capitals) आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या काइल मेयर्सने लखनऊकडून खेळल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात अर्धशतक झळकावले, तेही झंझावाती पद्धतीने.

काइल मेयर्सने दिल्लीविरुद्ध 38 चेंडूत 73 धावा केल्या आणि आयपीएल पदार्पणातच अर्धशतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तो सामील झाला, पण चेन्नईविरुद्ध त्याने पुन्हा एकदा झंझावाती पद्धतीने अर्धशतक पूर्ण करताच तो पहिला खेळाडू ठरला.

तसेच, आयपीएलच्या (IPL) इतिहासात लीगच्या सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये अर्धशतके झळकावली आहेत. याशिवाय, एमए चिदंबरम स्टेडियमवर सर्वात वेगवान अर्धशतक झळकावण्याच्या बाबतीत काईल मेयर्स संयुक्तरित्या पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT