CSK vs GT Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Prize Money: फक्त विजेत्या-उपविजेत्यांनाच नाही, तर पुरस्कार जिंकणाऱ्या खेळाडूंनाही लाखोंची बक्षीसं

आयपीएल 2023 विजेत्या, उपविजेत्या संघांबरोबरच पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मोठ्या बक्षीस रकमेची बरसात होणार आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Prize Money: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धा गेल्या दोन महिन्यापासून सुरू होती. आता आयपीएलच्या या 16 व्या हंगामातील अंतिम सामन्यात प्रवेश करणारे दोन संघ मिळाले आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स आणि हार्दिक पंड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ अंतिम सामना खेळणार आहेत.

अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी होणार आहे. या सामन्याला रविवारी संध्याकाळी ७.३० वाजता सुरुवात होईल. विशेष गोष्ट अशी की या हंगामातील सर्वात पहिला सामनाही नरेंद्र मोदी स्टेडियमवरच गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्स संघात झाला होता.

कोट्यवधींची बक्षीसे

दरम्यान, या हंगामात विजेत्या, उपविजेत्या, तसेच पुरस्कार विजेत्या खेळाडूंवर मोठ्या बक्षीस रकमेची बरसात होणार आहे. माध्यमांतील रिपोर्टनुसार आयपीएल २०२३ स्पर्धेसाठी एकूण ४६.५ कोटी रुपयांची बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

यातील विजेत्या संघाला २० कोटी रुपये देण्यात येतील, तसेच उपविजेत्या संघाला १३ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याशिवाय तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या मुंबई इंडियन्सला ७ कोटी रुपये आणि चौथ्या क्रमांकावर राहिलेल्या लखनऊ सुपर जायंट्स संघाला ६.५ कोटी रुपये मिळणार आहे.

याशिवाय विविध पुरस्कार विजेत्या खेळाडूंनाही मोठी बक्षीस रक्कम मिळणार आहे

आयपीएल २०२३ स्पर्धेतील बक्षीसे

  • विजेता संघ - २० कोटी

  • उपविजेता संघ - १३ कोटी

  • तिसरा क्रमांक (मुंबई इंडियन्स) - ७ कोटी

  • चौथा क्रमांका (लखनऊ सुपर जायंट्स) - ६.५ कोटी

  • उदयोन्मुख खेळाडू - २० लाख

  • सुपर स्ट्रायकर - १५ लाख

  • ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) - १५ लाख

  • पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट्स) - १५ लाख

  • मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर - १२ लाथ

  • सर्वाधिक षटकार - १२ लाख

  • गेम चेंजर - १२ लाख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT