Kagiso Rabada Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: कगिसो रबाडाने रचला इतिहास, मलिंगाचा मोडला रेकॉर्ड!

IPL 2023, Kagiso Rabada: पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने गुरुवारी आयपीएलमध्ये इतिहास रचला.

Manish Jadhav

IPL 2023, Kagiso Rabada: पंजाब किंग्जचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाने गुरुवारी आयपीएलमध्ये इतिहास रचला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये सर्वात जलद 100 बळी घेणारा तो अव्वल गोलंदाज ठरला.

गुजरात टायटन्सविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात रबाडाने हा टप्पा गाठला. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने आपल्या 64 व्या आयपीएल सामन्यात हा टप्पा गाठला.

यासह रबाडाने श्रीलंकेचा अनुभवी लसिथ मलिंगाला मागे टाकले. मलिंगाने आपल्या 70 व्या सामन्यात 100 वी विकेट घेतली होती.

भुवनेश्वर कुमार हा भारताचा नंबर 1 गोलंदाज आहे

भुवनेश्वर कुमार हा आयपीएलमध्ये (IPL) सर्वात जलद 100 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे. हा टप्पा गाठणारा तो एकूण तिसरा जलद गोलंदाज आहे.

भुवीपाठोपाठ राशिद खान 83 सामने, अमित मिश्रा 83 सामने आणि आशिष नेहरा 83 सामन्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे. भारतीय गोलंदाज युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) 84 सामन्यांत हे स्थान गाठले.

सर्वात जलद 100 IPL विकेट्स

1438 - कगिसो रबाडा

1622 - लसिथ मलिंगा

1619 - ड्वेन ब्राव्हो

1647 - हर्षल पटेल

सामन्याबद्दल बोलायचे झाले तर पंजाब किंग्जने पहिल्यांदा फलंदाजी करताना 20 षटकात 153 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या गुजरात टायटन्सच्या संघाला रबाडाने पहिले यश मिळवून दिले. रबाडाने ऋद्धिमान साहाला 30 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT