Rinku Singh
Rinku Singh Dainik Gomantak
क्रीडा

Video: 6,6,6,6,6... अन् सामना KKR च्या नावावर! पाहा रिंकू सिंगचे मॅचविनिंग सलग 5 सिक्स

Pranali Kodre

Rinku Singh 5 consecutive Sixes: इंडियन प्रीमियर लीग 2023 मधील 13 वा सामना नाट्यमयरित्या संपला. हा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स संघात नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात कोलकाताने अखेरच्या चेंडूवर गुजरातच्या तोंडातील विजयाचा घास हिसकावत 3 विकेट्सने सामना जिंकला.

या सामन्यात गुजरातने केकेआरसमोर 205 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना केकेआरला अखेरच्या षटकात 29 धावांची गरज होती. या षटकात गुजरातकडून यश दयालने गोलंदाजी केली. त्यावेळी त्याच्या पहिल्या चेंडूवर केकेआरकडून उमेश यादव आणि रिंकू सिंगने एकेरी धाव काढली.

त्यामुळे रिंकू स्ट्राईकवर आला. त्याने त्यानंतर सगल 5 षटकार मारले. त्याने या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर एक्ट्रा कव्हरच्या दिशेने षटकार खेचला. त्यानंतर त्याने तिसऱ्या चेंडूवर बॅकवर्ड स्क्वेअरच्या दिशेने षटकार खेचला.

चौथ्या चेंडूवर त्याने लाँग ऑफला, तर पाचव्या चेंडूवर लाँग ऑनला षटकार मारले. त्यानंतर त्याने अखेरच्या चेंडूवरही षटकार मारत केकेआरचा विजय निश्चित केला. त्याच्या 5 षटकारांमुळे केकेआरने 20 षटकात 7 बाद 207 धावा करत सामना जिंकला.

या सामन्यात केकेआरकडून पहिल्या दोन विकेट्स लवकर गेल्यानंतर वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नितीश राणा यांनीही चांगला खेळ केला होता. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 55 चेंडूत 100 धावांची भागीदारी केली होती. ही भागीदारीही महत्त्वाची ठरली.

पण नितीश 29 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 45 धावांची खेळी करून बाद झाला. तसेच वेंकटेशने 40 चेंडूत 83 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने 8 चौकार आणि 5 षटकार मारले. या दोघांना अल्झारी जोसेफने बाद केले.

हे दोघे बाद झाल्यानंतर 17 व्या षटकाच्या पहिल्या तीन चेंडूवर गुजरातचा प्रभारी कर्णधार राशिद खानने आंद्रे रसल (1), सुनील नारायण (0) आणि शार्दुल ठाकूर (0) यांना बाद करत हॅट्रिक साजरी केली. त्यामुळे केकेआर संकटात सापडले होते. मात्र, अखेरच्या षटकात रिंकूने केलेल्या तुफानी खेळामुळे केकेआरने विजय मिळवला.

तत्पूर्वी गुजरातकडून साई सुदर्शन आणि विजय शंकर यांनीही आक्रमक अर्धशतके झळकावली. सुदर्शनने 38 चेंडूत 3 चौकार आणि 2 षटकारांसह 53 धावा केल्या, तर शंकर 24 चेंडूत 4 चौकार आणि 5 षटकारांसह 63 धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे गुजरातला 20 षटकात 4 बाद 204 धावा करता आल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT