Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: 'पंड्या ब्रदर्स'च्या युद्धात हार्दिकची बाजी! लखनऊला पराभूत करत गुजरात प्लेऑफच्या उंबरठ्यावर

आयपीएल 2023 स्पर्धेत रविवारी गुजरात टायटन्सने लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध विजय मिळवत प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

Pranali Kodre

Gujarat Titans vs Lucknow Super Giants: इंडियन प्रीमियर लीग २०२३ स्पर्धेत ५१ वा सामना गुजरात टायटन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स संघात झाला. नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने ५६ धावांनी विजय मिळवला. हा गुजरातचा ८ वा विजय ठरला आहे. त्यामुळे त्यांनी प्लेऑफच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले आहे.

या सामन्यात गुजरातने लखनऊसमोर २२८ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊला २० षटकात ७ बाद १७१ धावाच करता आल्या.

या सामन्यात गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनऊकडून काईल मेयर्स आणि क्विटन डी कॉक यांनी आक्रमक सुरुवात केली होती. या दोघांनीही पहिल्या ८ षटकातच धावफलकावर ८० धावा लावल्या होत्या पण त्यांची ८८ धावांची भागीदारी मोहित शर्माने तोडली. त्याने ९ व्या षटकात मेयर्सला ४८ धावांवर माघारी धाडले. त्यानंतर दीपक हुडाही ११ धावांवर आणि मार्कस स्टॉयनिस ४ धावांवर माघारी परतला.

दरम्यान, एक बाजू सांभाळलेल्या क्विंटन डी कॉकने अर्धशतकी खेळी केली होती. पण त्याला राशीद खानने त्याच्या वैयक्तिक चौथ्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्रिफळाचीत केले आणि लखनऊला मोठा धक्का दिला. डी कॉक ४१ चेंडूत ७० धावा करून बाद झाला. त्याने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. यानंकर निकोलस पूरनलाही खास काही करता आले नाही.

पण आयुष बदोनीने अखेरीस आक्रमक खेळ केला होता. पण त्याला १९ व्या षटकात मोहित शर्माने २१ धावांवर माघारी धाडले. त्याच्या पुढच्याच चेंडूवर मोहितने कर्णधार कृणाल पंड्यालाही शुन्यावर बाद केले. त्यामुळे लखनऊला या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

गुजरातकडून मोहित शर्माने शानदार गोलंदाजी करताना ४ षटकात २९ धावांत ४ विकेट्स घेतल्या. तसेच नूर अहमद, राशीद खान आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली.

तत्पूर्वी, लखनऊचा कर्णधार कृणालने नाणेफेक जिंकून गुजरातला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. मात्र गुजरातकडून वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल यांनी शानदार सुरुवात करताना पहिल्या १२ षटकातच शतकी भागीदारी साकारत लखनऊच्या गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. साहाने तर आक्रमक पवित्रा स्विकारला होता. त्याने २० चेंडूतच त्याचे अर्धशतक पूर्ण केले होते. तसेच दुसरी बाजू गिलने चांगली सांभाळलेली होती.

पण त्यांची भागीदारी अवेश खानने १३ व्या षटकात तोडली. त्याने साहाला बाद केले. साहाने ४३ चेंडूत ८१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने १० चौकार आणि ४ षटकार मारले. पण त्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने गिलला चांगली साथ दिली. पण हार्दिकला मोहसिन खानने २५ धावांवर बाद केले. त्यानंतर डेव्हिड मिलरने गिलला साथ देत गुजरातला २०० धावांचा टप्पा ओलांडून दिला.

अखेर गिल ५१ चेंडूत २ चौकार आणि ७ षचकारांसह ९४ धावा करत नाबाद राहिला. तसेच मिलर २१ धावांवर नाबाद राहिला. त्यामुळे गुजरातने २० षटकात २ बाद २२७ धावा केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT