CSK vs GT Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Final: फायनलमध्ये चेन्नई - गुजरात संघात होणार बदल? पाहा कशी असून शकतात Playing XI

CSK vs GT: आयपीएल 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघ आमने-सामने असणार आहेत.

Pranali Kodre

IPL 2023 Final, Chennai Super Kings vs Gujarat Titans Predicted 11: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रविवारी म्हणजेच आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात अंतिम सामना रंगणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. आता या दोन संघापैकी कोण विजेतेपद पटकावणार याची उत्सुकता चाहत्यांमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, हा सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार असल्याने फलंदाजांचे वर्चस्व दिसण्याची शक्यता आहे. या मैदानावरील खेळपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे चेन्नई आणि गुजरात यांच्यात या हंगामातील सर्वात पहिला सामनाही याच मैदानावर झाला होता. आता अंतिम सामन्यातही हे दोन संघ आमने-सामने आहेत.

कशी असेल प्लेइंग इलेव्हन

या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्स बदल करण्याची शक्यता कमी आहे. चेन्नई आपला विजयी संघच कायम ठेवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे प्रथम फलंदाजी करणार असतील, तर मथिशा पाथिराना, तर प्रथम गोलंदाजी करणार असतील, तर अंबाती रायुडू इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून खेळताना दिसू शकतात.

याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे सलामीला फलंदाजी करतील. तसेच मधल्या षटकांमध्ये फलंदाजीचा भार अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, एमएस धोनी यांच्याबरोबर अष्टपैलू म्हणून खेळणाऱ्या रविंद्र जडेजा आणि मोईन अली यांच्यावरही असेल.

जडेजा आणि अली फिरकी गोलंदाजीचीही धूरा सांभाळतील, त्यांना महिश तिक्षणा यांचीही साथ मिळेल. तसेच मथिशा पाथिराना, तुषार देशपांडे आणि दीपक चाहर वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळतील.

गुजरातचा संघही त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करण्याची शक्यता कमी आहे. गुजरातकडून शुभमन गिल आणि जोशुआ लिटिल इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट म्हणून खेळू शकतात. गुजरातकडून सलामीला वृद्धिमान साहा आणि शुभमन गिल उतरू शकतात.

तसेच मधल्या फळीत साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर हे खेळू शकतात. कर्णधार हार्दिक फलंदाजीबरोबरच गोलंदाजी करतानाही दिसू शकतो. तसेच राहुल तेवतिया देखील फिनिशर म्हणून खेळताना दिसू शकतो.

गोलंदाजीत राशीद खान आणि नूर अहमद फिरकी गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात. राशीद खालच्या फळीत फलंदाजीतही योगदान देऊ शकतो. तसेच मोहम्मद शमी, मोहित शर्मा आणि जोशुआ लिटिल वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळू शकतात.

आमने-सामने

चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये आत्तापर्यंत ४ वेळा आमने-सामने आले आहेत. यातील तीनवेळा गुजरातने विजय मिळवला आहे आणि चेन्नईने एकदा विजय मिळवला आहे.

असे असून शकतात प्लेइंग इलेव्हन (इम्पॅक्ट प्लेअरसह)

  • चेन्नई सुपर किंग्स - डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, मोईन अली, रविंद्र जडेजा, एमएस धोनी, दीपक चहर, तुषार देशपांडे, महिश तिक्षणा, (मथिशा पाथिराना)

  • गुजरात टायटन्स - शुभमन गिल, ऋद्धिमान साहा, साई सुदर्शन, हार्दिक पंड्या, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी, मोहित शर्मा, (जोशुआ लिटल)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT