Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: जड्डूच्या फिरकीची जादू, संजू सॅमसनला केलं क्लीन बोल्ड; VIDEO

IPL 2023: आयपीएलचा 17 वा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत.

Manish Jadhav

IPL 2023: आयपीएलचा 17 वा सामना चेपॉक स्टेडियमवर खेळला जात आहे, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे संघ आमनेसामने आहेत.

या सामन्यात CSK नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे. 10 षटके संपेपर्यंत राजस्थानच्या 95 धावांवर 3 विकेट्स पडल्या. रवींद्र जडेजाने 9 व्या षटकात 2 बळी घेतले. त्याने देवदत्त पडिक्कल आणि संजू सॅमसनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

संजू सॅमसनची शिकार करण्यासाठी जडेजाने हे केले

वास्तविक, रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) 9 वे षटक टाकण्यासाठी आला. या षटकात त्याने पहिल्यांदा देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या चेंडूवर झेलबाद केले, त्यानंतर पाचव्या चेंडूवर संजू सॅमसनला क्लीन बोल्ड केले. संजूला काही कळेपर्यंत बॉलने आपले काम केले.

पडिक्कलने 38 धावा केल्या

देवदत्त पडिक्कलने 26 चेंडूत 38 धावांची शानदार खेळी केली. तर संजू सॅमसन (Sanju Samson) 2 चेंडूत खाते न उघडता परतला. पडिक्कलने 5 चौकार मारले.

दोन्ही संघाची 11 इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (w/c), देवदत्त पडिककल, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, जेसन होल्डर, कुलदीप सेन, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल

चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉनवे, रुतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (w/c), सिसांडा मगला, महेश थेक्षाना, तुषार देशपांडे, आकाश सिंग.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Illegal Betting Case: ईडीची मोठी कारवाई! सुरेश रैना आणि शिखर धवन यांची 11.14 कोटींची संपत्ती जप्त; 'वन एक्स बेट'चा प्रमोशन करार पडला महागात

ट्रेनमध्ये भारतीय जवानाचा खून; चादरच्या वादातून साबरमती एक्सप्रेसमध्ये घडली घटना

"... म्हणून मी मांसाहार सोडला", आरोग्यमंत्री विश्वजित राणेंचा भावनिक खुलासा; Watch Video

Goa Politics: मंत्रीपद देतो म्हटलं की धावत येतील, विरोधकांच्या एकीचा उपयोग होणार नाही, 2027 मध्ये गोव्यात भाजपचीच सत्ता; विश्वजीत राणे

Cricket Controversy: "आपसी रंजिश, गुस्सा और खराब भाषा..." ज्युनियर्सवर हल्ल्याच्या आरोपानंतर बांगलादेशी कर्णधाराचा मोठा खुलासा, पोस्ट करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT