Kolkata Knight Riders Dainik Gomantak
क्रीडा

आयपीएल 2022 प्लेऑफ अन् Womens T20 Challenge ची घोषणा, या ठिकाणी सामने?

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या प्लेऑफचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 (IPL 2022) च्या प्लेऑफचे वेळापत्रक आणि ठिकाण जाहीर करण्यात आले आहे. आयपीएल प्लेऑफचे 2 सामने कोलकातामध्ये होणार आहेत. त्याचवेळी, दुसरा क्वालिफायर आणि आयपीएलचा अंतिम सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाईल. बीसीसीआयने महिला टी-20 चॅलेंज स्पर्धेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. या स्पर्धेला 23 मे पासून पुण्यात सुरुवात होणार आहे, तर अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. बीसीसीआयच्या (BCCI) वेळापत्रकानुसार, आयपीएलचा पहिला क्वालिफायर 24 मे रोजी कोलकातामध्ये (Kolkata) होणार आहे. पहिला क्वालिफायर गुणतालिकेतील क्रमांक 1 आणि क्रमांक 2 संघांमध्ये असेल.

दरम्यान, आयपीएलचा एलिमिनेटर सामना गुणतालिकेतील 3 आणि 4 क्रमांकाच्या संघांमध्ये होईल. हा सामना 25 मे रोजी कोलकातामध्ये खेळवला जाईल. 27 मे रोजी क्वालिफायर 2 आणि अंतिम सामना 29 मे रोजी खेळवला जाईल. हे दोन्ही सामने अहमदाबादमध्ये (Ahmedabad) होणार आहेत.

तसेच, आयपीएल 2022 दरम्यान महिला टी-20 चॅलेंज देखील सुरु होईल. सर्व सामने पुण्यात होणार आहेत. 23 मे पासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 मे रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार 7.30 वाजता सामने सुरु होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT