ipl 2022 devon conway after 3 innings most runs for chennai super kings rcb vs csk Dainik Gomantak
क्रीडा

डेव्हॉन कॉनवेने सुरेश रैनाचा मोडला विक्रम, हेडन-हसीच्या विशेष यादीत समावेश

डेव्हॉन कॉनवेने तिसरे स्थान पटकावले

दैनिक गोमन्तक

आयपीएल 2022 चा 49 वा सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्यात खेळला गेला. या सामन्यात चेन्नईला 13 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, चेन्नईच्या पराभवानंतरही संघाचा प्रतिभावान फलंदाज डेव्हॉन कॉनवे याने एक खास विक्रम आपल्या नावावर केला. त्याने सुरेश रैनाला मागे टाकत मॅथ्यू हेडन आणि मायकेल हसीच्या खास यादीत स्थान मिळवले. (ipl 2022 devon conway after 3 innings most runs for chennai super kings rcb vs csk)

चेन्नईसाठी 3 सामने खेळल्यानंतर सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत कॉनवे तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने 3 सामन्यात 144 धावा केल्या आहेत. तर सुरेश रैनाने 3 सामन्यांनंतर 113 धावा केल्या. त्यामुळे ते चौथ्या स्थानावर पोहोचले आहेत. या बाबतीत हेडन पहिल्या स्थानावर आहे. हेडनने 176 धावा केल्या आहेत. तर हसी दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने 3 सामने खेळून 168 धावा केल्या. कॉनवे हा चेन्नईचा प्रतिभावान खेळाडू असून त्याने तिसरे स्थान पटकावले आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की न्यूझीलंडचा खेळाडू कॉनवेची मूळ किंमत 1 कोटी रुपये होती. चेन्नईच्या फ्रँचायझीने त्याला 2022 च्या आयपीएल लिलावात केवळ एक कोटी रुपयांना विकत घेतले. त्याचा आयपीएलचा हा पहिलाच हंगाम आहे. यामध्ये तो केवळ 3 सामने खेळला आहे. यादरम्यान कॉनवेने 2 अर्धशतके झळकावली आहेत. नाबाद 85 ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे. कॉनवेने या तीन सामन्यांमध्ये 14 चौकार आणि 6 षटकार मारले आहेत. येत्या सामन्यांमध्ये चेन्नईला कॉनवेकडून अधिक अपेक्षा असतील.

सीएसकेसाठी 3 डावांनंतर सर्वाधिक आयपीएल धावा -

176 - मॅथ्यू हेडन

168 - मायकेल हसी

144 - डेव्हॉन कॉन्वे

113 - सुरेश रैना

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: काँग्रेसला बाजूला सारुन ‘गोवा फर्स्ट’चा प्रयोग कितपत यशस्वी होणार? सरदेसाईंच्या नव्या राजकीय प्रयोगावर सवाल; विरोधकांच्या ऐक्याची खरी कसोटी आता

Budh Gochar 2026: हस्त नक्षत्रात बुधाचे महागोचर! 5 राशींच्या जातकांची तिजोरी पैशांनी ओसंडून वाहणार; व्यवसायात येणार मोठी तेजी

Education System Crisis: सत्य निकेतनची इमारतच नाही, तर शिक्षण व्यवस्थाही ढासळतेय! विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेपासून शिक्षणाच्या बजेटपर्यंत गंभीर प्रश्न

Karapur Mega Project: 161 दिवसांनंतर कारापूरवासीयांचे आंदोलन अखेर मागे! 'वन गोवा' प्रकल्पाला काम बंद करण्याची पंचायतीची नोटीस; न्यायालयीन लढा मात्र सुरूच

Goa Forward AAP Alliance: 'गोवा फर्स्ट' आघाडीची तयारी अंतिम टप्प्यात! विजय सरदेसाईंना सर्वाधिकार; 'आप'सह समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा निर्णय

SCROLL FOR NEXT