Sanju Samson Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023: CSK विरुद्ध मॅच जिंकली, पण RR चा कर्णधार सॅमसनला 'या' कारणामुळे झाला लाखांचा दंड

चेन्नई सुपर किंग्सविरुद्धचा सामना जिंकल्यानंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Chennai Super Kings vs Rajasthan Royals: इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात बुधवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर 17 वा सामना झाला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने अखेरच्या चेंडूवर 3 धावांनी विजय मिळवला. पण या विजयानंतरही राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनवर दंडाची कारवाई करण्यात आली आहे.

या सामन्यात राजस्थान रॉयल्सने षटकांची गती कमी राखल्याने सॅमसनला आयपीएलच्या आचारसंहितेनुसार 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबद्दल आयपीएसच्या प्रसिद्धीपत्रकात सांगण्यात आले आहे की 'राजस्थान रॉयल्सवर एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडलेल्या 17 व्या सामन्यात षटकांची गती कमी राखल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.'

'आयपीएलच्या आचार संहितेतील षटकांच्या गती कमी राखण्याबाबतची ही संघाची या हंगामातील पहिली चूक होती. त्यामुळे संजू सॅमसनवर 12 लाखांचा दंड ठोठवण्यात आला आहे.'

दरम्यान, 2008 नंतर पहिल्यांदाच राजस्थान रॉयल्सने एमए चिदंबरम स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध विजय मिळलला आहे.

या सामन्यात सीएसकेने नाणेफेक जिंकून राजस्थानला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले होते. त्यामुळे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 8 बाद 175 धावा केल्या होत्या. राजस्थानकडून सलामीवीर जॉस बटलरने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली.

तसेच देवदत्त पडिक्कल, आर अश्विन आणि शिमरॉन हेटमायर यांनीही छोटेखानी पण महत्त्वपूर्ण खेळी केल्या. सीएसकेकडून आकाश सिंग, तुषार देशपांडे आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

नंतर 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सीएसकेकडून सलामीवीर डेव्हॉन कॉनवेने 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याचबरोबर अजिंक्य रहाणेने महत्त्वपूर्ण 31 धावांची खेळी केली.

अखेरीस आक्रमक फलंदाजी करताना रविंद्र जडेजाने 15 चेंडूत 25 धावांची आणि एमएस धोनीने 17 चेंडूत 32 धावांची नाबाद खेळी केली. पण त्यांना सीएसकेला विजय मिळवून देता आला नाही. सीएसकेला 20 षटकात 6 बाद 172 धावाच करता आल्या. राजस्थानकडून आर अश्विन आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT