IPL 2021: SRH beat RR by 7 Wickets, SRH win can affect on points table for RR position  Twitter @IPL
क्रीडा

IPL 2021: 'हम तो डूबें है सनम तुम्हें भी ले डूबेंगे', SRH मुळे RR ची वाट खडतर

SRH ने सोमवारी दुबईत खेळलेल्या सामन्यात (IPL 2021) राजस्थान रॉयल्सचा (RR) सात गडी राखून पराभव केला.

दैनिक गोमन्तक

IPL 2021 सनरायझर्स हैद्राबादसाठी (SRH) चांगले राहिले नाही. या मौसमात हैद्राबादचा परफॉर्मन्स सर्वात खराब राहिला आहे मात्र, या संघाने सोमवारी दुबई (UAE Stadium) आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा (RR) सात गडी राखून पराभव केला. सनरायझर्सला प्लेऑफमध्ये जाणे आधीच अशक्य आहे, परंतु या विजयानंतर आता राजस्थानलादेखील अंतिम 4 मध्ये पोहोचणे देखील कठीण झाले आहे. (IPL 2021: SRH beat RR by 7 Wickets, SRH win can affect on points table for RR position)

Points Table

मात्र, हैद्राबादचा कर्णधार केन विल्यमसन सनरायझर्सच्या विजयाने खूप आनंदी आहे. त्याने संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. राजस्थानवर विजय नोंदवल्यानंतर संघाच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाल्याचे विल्यमसनने सांगितलेआहे.

काल 165 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने 18.3 षटकांत तीन गडी गमावून 167 धावा करत 10 सामन्यांमध्ये हंगामातील दुसरा विजय नोंदवला आहे. मातील दुसरा विजय नोंदवला. जेसन रॉयने संघासाठी पहिला सामना खेळताना 42 चेंडूत 60 धावा तर विल्यमसनने नाबाद 51 धावा केल्या.

विल्यमसनने रॉयच्या खेळीचे कौतुक करतानाच गोलंदाजांचे देखील सामन्यात पुनरागमन केल्याबद्दल कौतुक केले आहे . तो म्हणाला, “राजस्थानच्या डावातील शेवटची दोन षटके आमच्यासाठी खूप महत्त्वाची होती. संजू सॅमसनने चांगली फलंदाजी केली पण आम्ही त्याला थोड्या कमी स्कोअरवर रोखण्यात यशस्वी झालो. रॉयने संघात ऊर्जा ओतली. त्याने शानदार कामगिरी केली. त्याला संधी मिळत नव्हती पण तो नेहमी खेळायला तयार होता.असे सांगत त्याने आपल्या संघाचे कौतुक केले आहे.

राजस्थानी सामन्यातील कामगिरी

राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनच्या 82 धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या मदतीने 164 धावा केल्या. संघासाठी सॅमसन व्यतिरिक्त फक्त यशस्वि जयस्वालच चांगली खेळी खेळू शकला. त्याने 23 चेंडूत 36 धावा केल्या. महिपाल लोमरने सॅमसनसोबत नक्कीच मोठी भागीदारी केली, पण तो 27 चेंडूत फक्त 28 धावा करू शकला. एविन लुईस, लियाम लिव्हिंग्स्टन सारखी मोठी परदेशी नावे फ्लॉप ठरली. आणि याचमुळे राजसथनला मोठा स्कोर उभा करता आला नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT