अंबती रायुडू (Ambati Rayudu) आरसीबी सोबत असणाऱ्या पुढील सामन्यात खेळू शकेल.  Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: CSKसाठी गुड न्यूज अंबती रायुडू पुढील सामन्यात खेळणार

CSKचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला (Mahendra Singh Dhoni) विचारले असता, तो म्हणाला, रायुडू (Ambati Rayudu) आता तरी हसत आहे, म्हणजेच त्याचे हाड मोडलेले नाही. पण पुढील परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे.

दैनिक गोमन्तक

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) चौदाव्या हंगामातील दुसऱ्या टप्प्याला रविवार 19 सप्टेंबर पासून सुरुवात झाली असून, काल चेन्नईने (Chennai) मुंबईचा (Mumbai) 20 धावांनी पराभव करत IPL च्या दुसऱ्या टप्प्याची जोरदार सुरुवात करत गुणतालिकत प्रथम स्थान पटकाविले आहे. या सामन्यात चेन्नईचा अनुभवी फलंदाज अंबती रायुडू (Ambati Rayudu) याच्या हतावर चेंडू लागल्याने तो जायबंदी झाला आहे. परंतु आता या संदर्भात चेन्नईसाठी गुड न्यूज आली असून, रायुडूचा एक्सरे (X-ray) काढला असता त्यात त्याला फ्रॅक्चर (Fracture) नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तो पुढील RCB विरुध्दच्या सामन्यात उपलब्ध असेल.

कालच्या सामन्यात मुंबईच्या मिल्ने दुसऱ्या षटकात टाकलेल्या शेवटच्या चेंडूवर पुल शॉट मारण्याच्या त्याच्या हताला चेंडूलागून त्याला दुखापत झाली आहे. फिजिओने मैदानात येऊन त्याला होत असलेल्या वेदना पाहून रायुडूला मैदान सोडण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तो संपूर्ण सामन्यात मैदानात उतरलाच नाही. रायुडूच्या दुखापतीबाबत चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला विचारले असता, तो म्हणाला, रायुडू आता तरी हसत आहे, म्हणजेच त्याचे हाड मोडलेले नाही. पण पुढील परिस्थितीवर सर्व काही अवलंबून आहे. पुढील सामन्यासाठी चार दिवसांचा अवधी आहे. त्यामुळे तो त्यावेळी खेळेल अशी मला अशा आहे.

त्यानंतर रायुडूचा एक्सरे करण्यात आला होता. त्याचा रिपोर्ट आज मिळाला असून, त्याच्या हताला फॅक्चर नाही. त्यामुळे तो आरसीबी सोबत असणाऱ्या पुढील सामन्यात खेळू शकेल. या गुड न्यूजमुळे चेन्नईने सुटकेचा निश्वास टाकला आहे. रायूडू चेन्नईच्या मधल्या फळीतील सर्वात महत्त्वपूर्ण फलंदाज आहे. यापूर्वी मुंबईचे प्रतिनिधित्व करणारा रायूडू 2018 पासून चेन्नईचा सदस्य आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

वर्षभरानंतर गोमंतकीयांना प्रतिदिनी हजार लीटर पाणी, 325 एमएलडी क्षमतेचे 11 जलशुद्धीकरण प्रकल्‍प

16 FDC Drugs Banned: 16 एफडीसी औषधांवर केंद्र सरकारकडून बंदी, सार्वजनिक आरोग्याच्या हितासाठी मोठा निर्णय

मुदतपूर्व निवडणुकीची सज्जता, भाजपच्या राज्य कार्यकारिणी बैठकीत रणनीतीवर खल; 40 जागा लढवून 30 जिंकण्याचा निर्धार

Horoscope: भानु सप्तमीचा दुर्मिळ शुभयोग! 'या' राशींवर सूर्यदेवाची विशेष कृपा; मान-सन्मान, यश आणि धनलाभाचे प्रबळ संकेत

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

SCROLL FOR NEXT