MS Dhoni with Faf Du Plessis (IPL 2021) Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2021: मुंबई विरुद्धच्या सामन्यात धोनीचा खास फलंदाज मुकण्याची शक्यता

फाफ डू फ्लेसिसच्या पहिल्या सामन्यात खेळण्यावर प्रश्नचिन्ह

Dainik Gomantak

IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्याची सुरवात होणार आहे, पहिला सामना धोनीच्या टीम Chennai Super Kingsचा आहे. 19 सप्टेबर सप्टेंबरला CSK चा सामना Mumbai Indians विरुद्ध असणार आहे, पण सामन्यापूर्वी धोनीसाठी (MS Dhoni) मोठी समस्या निर्माण होताना दिसत आहे.

धोनीच्या अडचण ही वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या CPL 2021 शी संबंधित आहेत, कारण तेथे Faf Du Plessis, त्याचा संघ सेंट लुसियासाठी सेमीफायनल सारख्या महत्वाच्या सामन्यात खेळत होता, सदर स्पर्धेदरम्यान मांडीच्या दुखापतीमुळे त्याला बाहेर बसावे लागले. आयपीएल 2021 च्या दुसऱ्या टप्प्यातील पहिल्या सामन्यातही आता त्याच्या मैदानात उतारण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. फाफ डु प्लेसिसला सीपीएल 2021 च्या क्वार्टर फायनल सामन्यापूर्वी दुखापत झाली होती, ज्यामुळे त्याला त्या सामन्यातून वगळण्यात आले होते, ज्यामुळे त्या नंतर त्याला सलग दुसऱ्या सामन्यात सुद्धा बाहेर राहावे लागले होते. यावरून त्याच्या दुखापतीचे गांभीर्य निश्चित केले जाऊ शकते.

फाफ डु प्लेसिस खेळला नाही तर ...

फाफ डु प्लेसिसची दुखापत चेन्नई सुपर किंग्जसाठी वाईट बातमी आहे, त्याच्या आकडेवारीवरून याचा अंदाज लावला जाऊ शकतो, आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यानंतर तो CSK साठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता, 2021 तो सर्वाधिक धाव करणाऱ्या ३ फलंदाजांपैकी एक होता. तो धवन आणि राहुल नंतर तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करणारा फालंदाज होता. त्याने पहिल्या टप्प्यात 7 सामने खेळले ज्यामध्ये त्याने 320 धावा केल्या, त्याने 95 धावांची नाबाद खेळी देखील केली. वेस्ट इंडिजमध्ये सुरू असलेल्या सीपीएलमध्ये, प्लेसीस दुखापत होण्याआधी उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, त्याने तेथे शतकही केले आहे. याशिवाय 2 शानदार अर्धशतकी खेळी देखील केल्या.

धोनीसमोर पर्याय कोण?

अशा परिस्थितीत, जर फाफ डू प्लेसिस मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात CSK चा भाग नसेल, तर धोनीचा समस्या वाढू शकते, धोनीला सलामीला फ्लेसिसचा पर्याय शोधणे हा एक मोठा प्रश्न असेल, ऋतुराज गायकवाड सोबत कोण जाणार सलामीला ? या महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर त्याच्या दोन खेळाडूंमध्ये आहे, एक रॉबिन उथप्पा आणि दुसरा अंबाती रायुडू, अश्या परिस्थितीत धोनी ऋतुराज सोबत सलामीला कोणाला पाठवतो, हे पाहणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT