IPL 2021 Dhonis fuss during practice  Watch the video
IPL 2021 Dhonis fuss during practice Watch the video 
क्रीडा

IPL 2021: सरावादरम्यान धोनीचा धुमाकुळ...पहा व्हिडिओ

गोमंतक वृत्तसेवा

 इंडियन प्रिमिअर लीगच्या 14 व्या हंगामाची सुरुवात काही दिवसातच होणार आहे. ही स्पर्धा भारतीयांसाठी उत्सवासारखी असते. आयपीएलच्या महोत्सवाची भारतीय लोक आतुरतेने वाट पाहत असतात. आयपीएल स्पर्धा ही भारताबरोबर जगातील सर्वाधिक लोकप्रिय असणारी क्रिकेट लीग आहे. यंदाच्या आयपीएलची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. 

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पाहण्यासाठी चाहते आगामी आयपीएलची चातकासाराखी वाट बघत आहेत. मागील आयपीएल हंमागामध्ये धोनी काही खास कामगिरी करु शकला नव्हता. परंतु यावेळी त्याच्या चाहत्यांना आशा आहे की, धोनी त्याच्या आक्रमक शैलीच्या रुपात दिसेल. 

दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये महेंद्रसिंग धोनी सराव सत्रादरम्यान मोठे फटकेबाजी करताना दिसत आहे. सरावादरम्यान धोनीच्या बॅटमधून उत्तुंग षटकारही आपल्याला पहायला मिळत आहेत. धोनीब्रिगेडसाठी मागील हंगाम चांगला गेला नसला तरी, यंदाच्या आयपीएल हंगामामध्ये धोनी आपल्या संघाला प्लेऑफ आणि त्याच्यापुढील प्रवासाला गती देईल, असा विश्वास चाहत्यांनी व्यक्त केला आहे. आयपीएलच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफमध्ये पोहचू शकला नव्हता. (IPL 2021 Dhonis fuss during practice  Watch the video)

मागील आयपीएलमध्ये धोनीने 14 सामन्यांमध्ये केवळ 200 धावा केल्या होत्या. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम धावसंख्या 47 एवढी होती. आयपीएलच्या 13 सत्रामध्ये चेन्नई सुपर किंग्ज 7 व्या स्थानावर होता. चेन्नई सुपर किंग्ज यावेळी 10 एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुध्द खेळून आपल्या आयपीएलच्या मोहीमेचा प्रारंभ करणार आहे. भारतीय संघामध्ये धडाकेबाज कामगिरी केलेला ऋषभ पंत यावेळी दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT