IPL Auction 2023 Dainik Gomantak
क्रीडा

IPL Auction 2023: बापरे! 19 खेळाडूंची बेस प्राईस 2 कोटी, पण एकही भारतीय नाही! पाहा संपूर्ण लिस्ट

आयपीएल लिलावासाठी 19 खेळाडूंची बेस प्राईज 2 कोटी रुपये आहे.

Pranali Kodre

IPL Auction 2023: इंडियन प्रीमीयर लीग 2023 स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसेंबर रोजी पार पडणार आहे. हा लिलाव कोची येथे होणार असून भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 2.30 वाजता लिलावाला सुरुवात होईल. दरम्यान, 405 खेळाडूंचा लिलावासाठी समावेश आहे.

आयपीएल 2023 लिलावासाठी एकूण 991 खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील 405 खेळांडूंची अंतिम निवड झाली. त्यामुळे आता या 405 खेळाडूंची नावे लिलावात असतील. विशेष म्हणजे या 405 खेळाडूंपैकी फक्त 87 खेळाडूंवरच बोली लागू शकते.

कारण, सर्व 10 आयपीएल संघांमध्ये मिळून 87 खेळाडूंचीच जागा रिकामी आहे. त्यातील 30 जागा परदेशी खेळाडूंच्या रिकाम्या आहेत. या 405 खेळाडूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत, तर 132 परदेशी खेळाडू आहेत.

दोन कोटीचे 19 खेळाडू

दरम्यान, 405 खेळाडूंमधील 19 खेळाडूंनी लिलावासाठी दोन कोटी मुळ किंमत ठेवली आहे. तसेच 11 खेळाडूंची दीड कोटी मुळ किंमत आहे. विशेष म्हणजे दोन आणि दीड कोटी मुळ किंमत असलेल्या खेळाडूंमध्ये एकाही भारतीय खेळाडूचा समावेश नाही.

भारतीय खेळाडूंमध्ये मनिष पांडे आणि मयंक अगरवाल यांची सर्वाधिक मुळ किंमत आहे. त्यांची 1 कोटी मुळ किंमत आहे. तसेच एकूण 20 खेळाडूंची किंमत 1 कोटी आहे, तर त्याखालोखाल 75 लाखाची मुळ किंमत 9 खेळाडूंची आहे.

दोन कोटीची मुळ किंमत असलेले खेळाडू - रिली रोसऊ, केन विल्यमसन, सॅम करन, कॅमेरॉन ग्रीन, जेसन होल्डर, बेन स्टोक्स, टॉम बॅंटन, निकोलस पूरन, फिल सॉल्ट, ख्रिस जॉर्डन, ऍडम मिलने, आदिल रशीद, ट्रॅव्हिस हेड, रस्सी व्हॅन डर दसन, जिमी नीशम, ख्रिस लिन, जेमी ओव्हरटन, क्रेग ओव्हरटन, टायमल मिल्स

दीड कोटीची मुळ किंमत असलेले खेळाडू - हॅरी ब्रूक, शाकिब अल हसन, झाय रिचर्डसन, ऍडम झम्पा, विल जॅक्स, डेविड मलान, शेरफेन रदरफोर्ड, रिले मेरेडिथ, जेसन रॉय, शॉन ऍबॉट, नॅथन कुल्टर-नाईल.

एक कोटीची मुळ किंमत असलेले खेळाडू - मयंक अग्रवाल, जो रूट, हेन्रिक क्लासेन, अकिल होसैन, मुजीब रहमान, तब्राइझ शम्सी, मनीष पांडे, डॅरिल मिशेल, मोहम्मद नबी, काइल जेमिसन, शाय होप, टॉम लॅथम, मायकेल ब्रेसवेल, अँड्र्यू टाय, ल्यूक वुड, डेव्हिड विसे, मोइसेस हेन्रिक्स, मॅट हेन्री, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT