Shikhar Dhavan  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA ODI: दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ODI मालिकेसाठी शिखर धवनच्या नेतृत्वाखाली संघ जाहीर

श्रेयस अय्यर उपकर्णधार, ऋतुराज गायकवाड, राहूल त्रिपाठी यांना संधी

गोमन्तक डिजिटल टीम

दक्षिण आफिक्रेविरोधात खेळल्या जाणाऱ्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. एवदिवसीय मालिकेसाठी कर्णधारपदाची जबाबदारी शिखर धवनच्या खांद्यावर देण्यात आली असून, श्रेयस अय्यरकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. यासह संघात ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजु सॅमसन, राहूल त्रिपाठी आणि इशान किशन यांना संधी देण्यात आली आहे.

(India’s squad for ODI series against South Africa announced)

सध्या भारताच्या दौऱ्यावर असणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरोधात भारतीय संघ तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. 06, 09 आणि 11 ऑक्टोबर रोजी उभय संघात तीन सामने होणार आहेत. सध्या द. आफ्रिकेविरूद्ध सुरू असलेल्या सामन्यात भारतीय संघ जोरदार कामगिरी करत आहे. अशीच कामगिरी एकदिवसीय सामन्यात अपेक्षित आहे.

असा असेल भारतीय संघ

शिखर धवन (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिभमन गिल, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), रजत पाटीदार, राहूल त्रिपाठी, इशान किशन (यष्टीरक्षक), संजु सॅमसन (यष्टीरक्षक), शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, रवी बिष्णोई, मुकेश कुमार, आवेश खान, मो. सिराज, दीपक चहर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

British Nationals Death In Goa: एक महिन्यात कांदोळीत तीन ब्रिटिश नागरिकांचा मृत्यू

Bank Loan: 181 कोटींची कर्जे थकित, बँकांकडून पाच वर्षांत घेतली 43,103 कोटींची कर्जे

E Challan Cyber Fraud: बनावट 'ई-चलन', सायबर भामट्यांचा नवा सापळा! वाहतूक विभागाकडून सतर्क राहण्याचे आवाहन

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

SCROLL FOR NEXT