Women indian team  Twitter
क्रीडा

IND vs PAK: 6 महिन्याच्या लेकीने घेतला आईच्या सामन्याचा मनमुराद आनंद

महिला विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला असून सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानचा 107 धावांनी पराभव केला. मिताली राजच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने स्पर्धेत सुरुवात विजयाने केली. भारतासाठी, पुजा वस्त्राकार आणि स्नेह राणा यांनी दमदार भागीदार करत अखेरीस वेगवान फलंदाजी केली. त्याएवजी टीम इंडियाने 245 धावांचे लक्ष्य ठेवले प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ 137 धावांवर सर्वबाद झाला. भारताच्या विजयानंतर एक अतिशय सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर सोशल मिडियावर एक सुंदर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये टीम इंडियाचे अनेक खेळाडू पाकिस्तानी कर्णधार विस्माह मारूफच्या मुलीसोबत खेळताना दिसत आहेत. बिस्मा मुलीला तिच्या कडेवर घेऊन उभी आहे. या व्हिडिओमध्ये हरमनप्रीती कौर आणि स्मृती मंधाना यांच्यासह अनेक खेळाडू दिसत आहेत. सोशल मिडियावर तो चांगलाच व्हायरल होत आहे.

पाकिस्तानवरच्या विजयात भारतासाठी पुजा आणि स्नेहसह राजेश्वर गायकवाड यांचेही मोलाचे योगदान आहे. त्याने 10 षटकात 31 धावा देत 4 बळी घेतले. तर झुलन गोस्वामीने 10 षटकात 26 धावा देत 2 बळी घेतले. झुलननेही मेडन ओव्हर काढली. स्नेह राणाने 9 षटकात 27 धावा देत 2 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Raj - Uddhav Thackeray: मुंबईत दुमदुमला 'आवाज मराठी'चा; 20 वर्षानंतर राज - उद्धव एकत्र

"हॉटेलचं जेवण चाखल्यावर घरचं आवडेल का?" प्रेमानंद महाराजांनी सांगितलं तरुणांच्या घटस्फोटांचं मुख्य कारण; Watch Video

Crime News: लाकडाच्या भुशात दारु लपवली, कर्नाटकच्या गाडीला गोव्याची नंबरप्लेट लावली; केरी नाक्यावर 12 लाखांचे गोवा बनावटीचे मद्य जप्त

Goa News Live Updates: एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी,उद्धवकडून फडणवीसांना आनाजीपंतांची उपमा

Goa Crime: प्रत्येकाने कायदा हातात घ्यायला सुरुवात केली तर; गोव्यात, देशात ‘जंगल राज’ निर्माण व्हायला वेळ लागणार नाही

SCROLL FOR NEXT