Lawn Bowls Women Team Twitter
क्रीडा

CWG2022: भारताचा दक्षिण आफ्रिकेवर दणदणीत विजय, लॉन बाउल्समध्ये सुवर्णपदक

CWG 2022: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला, लॉन बाउल्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे.

दैनिक गोमन्तक

CWG 2022: भारताने दक्षिण आफ्रिकेला हरवून इतिहास रचला, लॉन बाउल्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. कॉमनवेल्थ गेम्स 2022 इंग्लंडमधील बर्मिंगहॅम येथे आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये भारताने पाचव्या दिवशी सुवर्णपदक पटकावले. लॉन बॉल्सच्या (Lawn Bowls) महिलांच्या चार सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने इतिहास रचला आहे. या सामन्यात भारतासाठी रूपा राणी तिर्कीने महत्त्वाची भूमिका बजावली.

2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला संघाने मोठा इतिहास रचला आहे. लॉन बॉल्स स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सुवर्णपदक भारताच्या खात्यात जमा केले आहे. या स्पर्धेत भारताने पदक जिंकण्याची 92 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे.

महिला संघाच्या या स्पर्धेत टीम इंडियामध्ये लवली चौबे, पिंकी, नयनमोनी सैकिया, रूपा राणी यांचा समावेश होता. ज्याने सातत्याने चांगली कामगिरी करून देशासाठी पदके जिंकली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा 17-10 असा पराभव केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Women’s Asia Cup 2026: मैदानावर पुन्हा रंगणार भारत-पाक थरार! टीम इंडियाच्या वाघिणी सज्ज; मॅचची तारीख, वेळ आणि थेट प्रक्षेपणाचे सर्व अपडेट्स एका क्लिकवर

VIDEO: 'नेपाळमध्ये जलतांडव होईल, घरं पाण्यात बुडतील...' दोन महिन्यांपूर्वीचा व्हिडीओ व्हायरल; पाद्रीनं आधीच दिली होती संकटाची चाहूल

Unicef Child Safety Report: 1 वर्षात 2 कोटी मुले ठरली ऑनलाईन लैंगिक शोषणाची शिकार, युनिसेफच्या रिपोर्टनं खळबळ; धक्कादायक वास्तव आलं समोर

Goa Crime: लग्नाचे वचन, शारीरिक संबंध अन् 18 लाखांच्या फसवणूकीचा आरोप; ठोस पुराव्याअभावी संशयिताची निर्दोष सुटका

Electric Shock Death: विहिरीतील पंप तपासण्यासाठी गेला अन्... विजेचा धक्का बसून तरूणाचा दुर्दैवी मृत्यू, सातोर्ली-गावडोंगरी येथील घटना

SCROLL FOR NEXT