Indian Super League : Ishan Pandita ISL
क्रीडा

Indian Super League : ईशान पंडितास मैदानावर हवा जास्त वेळ

Indian Super League : आयएसएलच्या 2021-22 मोसमात एफसी गोवाच्या जर्सीत दिसणार नाही

किशोर पेटकर

पणजीः एफसी गोवातर्फे (FC Goa) गतमोसमातील इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत युवा आघाडीपटू ईशान पंडिता (Ishan Pandita) याला मैदानावर जास्त वाव मिळाला नाही, बदली खेळाडू ठरल्यामुळे तो सामन्याच्या अंतिम टप्प्यातच खेळताना दिसला. आगामी मोसमात त्याला मैदानावर जास्त वेळ खेळायचे असून त्यादृष्टीने त्याने नव्या संघात दाखल होण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आयएसएलच्या 2021-22 मोसमात 23 वर्षीय पंडिता एफसी गोवाच्या जर्सीत दिसणार नाही हे पक्के असून प्राप्त वृत्तानुसार, जमशेदपूर एफसी (Jamshedpur FC) त्याला करारबद्ध करणार आहे. त्यादृष्टीने एफसी गोवा संघ व्यवस्थापन सहमत झाले आहे. आगामी मोसमासाठी एफसी गोवाने स्पॅनिश स्ट्रायकर येराम काब्रेरा याला करारबद्ध केले आहे. गोव्यातील संघाच्या आघाडीफळीत तो हुकमी एक्का असेल.

एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी गतमोसमात पंडिताचा ‘सुपर सब’ या नात्याने खुबीने वापर केला. ११ सामन्यात तो फक्त १३१ मिनिटे खेळला. उपयुक्तता सिद्ध करताना स्पेनमध्ये युवा गटात व्यावसायिक फुटबॉल खेळलेल्या या आघाडीपटूने चार गोल नोंदविले. पंडिताच्या मोक्याच्या क्षणी गोल करण्याच्या कौशल्याने भारतीय सघाचे प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनाही प्रभावित केले, त्यामुळे तो भारताकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकला. तो कारकिर्दीतील पहिला सामना ओमानविरुद्ध या वर्षी २५ मार्च रोजी खेळला. वृत्तानुसार, जमशेदपूर एफसीचे प्रशिक्षक ओवेन कॉयल आगामी मोसमात पंडितास जास्त वेळ खेळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे पंडिताने एफसी गोवास सोडचिठ्ठी देऊन जमशेदपूरशी किमान दोन वर्षांचा करार करण्यास पसंती दिली आहे. स्पेनमधील तृतीय विभागीय स्पर्धेत लॉर्सा एफसीकडून खेळलेल्या पंडितास गतवर्षी एफसी गोवाने करारबद्ध केले होते. आयएसएल स्पर्धेव्यतिरिक्त तो एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतही एफसी गोवातर्फे खेळला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

England Cricket Team: इंग्लंड क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! स्टीफन फ्लेमिंग यांची प्रशिक्षकपदी वर्णी, जो रूटवर पुन्हा नेतृत्वाची जबाबदारी

Flight Viral Video: विमानात पॉवर बँकला अचानक आग; प्रवाशांमध्ये एकच गोंधळ, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

WWE News: 'SummerSlam 2026'पूर्वी WWE ला मोठा धक्का! 'मानधन अपेक्षेपेक्षा कमी मिळायचं' म्हणत स्टार रेसलरने ठोकला रामराम

Ramayana Trailer Reaction: 'रामायण: पार्ट 1'च्या ट्रेलरची चर्चा! रणबीरचं तेजस्वी रूप अन् यशचा रौद्र अवतार, चाहते मात्र नाराज; म्हणाले, 'हनुमान कुठे?'

Cutbona Jetty Fishing Season: कुटबण जेटीवर नव्या मासेमारी हंगामाची लगबग; हवामान, मजूर टंचाईची मच्छीमारांनी चिंता व्यक्त केली

SCROLL FOR NEXT