Indian Super League : Ishan Pandita Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: एफसी गोवाकडून ईशान पंडिता मुक्त

Indian Super League: गतमोसमात २३ वर्षीय खेळाडूचे ११ सामन्यांत चार गोल

दैनिक गोमंतक

पणजीः एफसी गोवा (FC Goa) संघाने अघोषित हस्तांतरण शुल्काच्या मोबदल्यात फुटबॉलपटू ईशान पंडिता (Ishan Pandita) याला मुक्त केले आहे. क्लबने रविवारी यासंबंधी माहिती दिली. त्यामुळे पंडिता आता आगामी इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल स्पर्धेत अन्य संघाकडून खेळू शकतो. प्राप्त माहितीनुसार, तो जमशेदपूर एफसी संघात रूजू होईल. गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत एफसी गोवाचे प्रशिक्षक हुआन फेरांडो यांनी ईशानचा राखीव खेळाडू या नात्याने जास्त वापर कला होता. त्यामुळे त्याला मैदानावर जास्त वेळ खेळता आले नव्हते. ईशान मैदानावर अधिक वेळ व्यतित करण्यास इच्छुक आहे.

गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत 23 वर्षीय पंडिताने एफसी गोवातर्फे 11 सामन्यांत चार गोल नोंदविले होते. सुपर सब या नात्याने तो या लढतीत खेळला होता. याशिवाय एफसी गोवाकडून तो एएफसी चँपियन्स लीग स्पर्धेतील सर्व सहाही सामन्यांत खेळला होता, मात्र या स्पर्धेत तो गोल नोंदवू शकला नाही. स्पेनमध्ये व्यावसायिक फुटबॉल खेळलेल्या पंडिता याला एफसी गोवाने गतवर्षी करारबद्ध केले होते. वैयक्तिक विकास ध्यानात ठेवून संधीचा शोध घेत असल्याचे ईशानने क्लबला कळविले होते. अन्य क्लबने योग्य प्रस्तावासह ईशानसाठी इच्छुकता दर्शविली, तेव्हा सर्वांच्या हिताच्या दृष्टीने आम्ही त्यास मान्यता दिली, जेणेकरून ईशानला खेळण्यासाठी अधिक वेळ मिळेल, असे एफसी गोवाचे फुटबॉल संचालक रवी पुस्कुर यांनी रविवारी सांगितले. आमचा क्लब नवोदितांना नेहमीच प्रोत्साहनाची संधी देतो, तेच धोरण आम्ही ईशानबाबत अवलंबिले, असे रवी यांनी नमूद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

Viral Post: 'मला नवरा हवाय, पण माझ्या अटींवर...' तरूणीने 'Google Form'वरून घेतली मुलांची परीक्षा! 240 हून अधिक पोरांनी दाखवला इंटरेस्ट, प्रश्न वाचून व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT