हैदराबाद एफसीने नायजेरियाचा माजी विश्वकरंडक फुटबॉल खेळाडू बार्थोलोमेव ओगबेचे याच्याशी एका वर्षाचा करार केला आहे. Dainik Gomantak
क्रीडा

Indian Super League: हैदराबाद संघात नायजेरियाचा माजी विश्वकरंडक खेळाडू

इंडियन सुपर लीग (Indian Super League) फुटबॉल (Football) स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत ओगबेचे सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: हैदराबाद (Hyderabad) एफसीने नायजेरियाचा (Nigeria) माजी विश्वकरंडक फुटबॉल (World Cup football) खेळाडू (Players) बार्थोलोमेव ओगबेचे याच्याशी एका वर्षाचा करार केला आहे. इंडियन सुपर लीग (आयएसएल) (Indian Super League) फुटबॉल (Football) स्पर्धेत सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंत ओगबेचे सध्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आघाडीफळीत खेळणारा ओगबेचे 36 वर्षांचा असून गतमोसमातील आयएसएल स्पर्धेत तो मुंबई सिटी एफसीकडून खेळला होता. त्या कालावधीत मुंबई सिटीने लीग विनर्स शिल्ड आणि आयएसएल करंडकही जिंकला होता. ओगबेचे नायजेरियातर्फे 11 आंतरराष्ट्रीय सामने खेळला असून 2002 मधील विश्वकरंडक स्पर्धेत तो दोन सामने खेळला होता. ओगबेचे फ्रान्स, संयुक्त अरब अमिराती, स्पेन, ग्रीस, इंग्लंड, नेदरलँड्स या देशात व्यावसायिक फुटबॉल खेळला आहे.

आयएसएल स्पर्धेतील नॉर्थईस्ट युनायटेडने ओगबेचे याला 2018-19 मोसमात करारबद्ध केले. पहिल्या मोसमात त्याने 12 गोल केले, नंतर 2019-20 मोसमात तो केरळा ब्लास्टर्स संघात दाखल झाला आणि 15 गोल नोंदविले. 2020-21 मोसमात मुंबई सिटीकडून खेळताना या नायजेरियन खेळाडूने आठ गोलची नोंद केली. एकंदरीत त्याने 35 गोल नोंदविले आहेत.

हैदराबाद एफसीशी करार केल्यानंतर, आगामी मोसमात संघाला प्ले-ऑफ फेरीत नेण्याचे मुख्य लक्ष्य असून क्लबमधील साऱ्यांच्या सहकार्याने हे आव्हान शक्य आहे, असे मत ओगबेचे याने व्यक्त केले. ओगबेचे हैदराबाद संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असेल आणि त्याचा अनुभव निर्णायक ठरेल, अशाप्रकारच्या खेळाडूंची संघाला गरज आहे. आघाडीपटू संघात मुख्य भूमिका बजावतो, असे या संघाचे प्रशिक्षक मानोलो मार्किझ यांना वाटते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: 'गोवा काँग्रेस' नावाला काँग्रेसचा आक्षेप; गिरीश चोडणकरांची गोवा खंडपीठात धाव, निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर सवाल

Birch By Romeo Lane Fire: लुथरा बंधूंसह अजय गुप्ताचा जामीन रद्द; 2 आठवड्यांत आत्मसमर्पणाचे गोवा हायकोर्टाचे आदेश

Double Murder Case: रक्षाबंधनाच्या तोंडावर रुडकीत दुहेरी हत्याकांड! भावानेच दोन सख्ख्या बहिणींची गोळ्या झाडून केली हत्या; काळजाचा ठोका चुकवणारा थरार

Tarun Tejpal Case: तेजपालला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा धक्का; 3 आठवड्यांत तुरुंगात आत्मसमर्पण करण्याचे आदेश

Goa E20 Petrol: 'ई-20'चा सर्वाधिक फटका गोव्याला? केजरीवालांचा भाजप सरकारवर निशाणा; 40 टक्क्यांहून गोमंतकीयांकडे चारचाकी

SCROLL FOR NEXT