Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

Virat Kohli आता अलिबागमध्येही राहणार! खरेदी केलाय कोट्यवधींचा आलिशान बंगला, पाहा Video

विराट कोहलीने अलिबागमध्ये कोट्यवधींचा आलिशान बंगला खरेदी केला आहे.

Pranali Kodre

Virat Kohli: भारताचा माजी कर्णधार विराट कोहली हा लोकप्रिय खेळाडू असण्याबरोबरच श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहे. तो क्रिकेटबरोबरच अनेक जाहीरातींमधून तसेच विविध व्यावसायातून कोट्यावधींची कमाई करत असतो. त्यामुळे त्याच्या अनेक ठिकाणी प्रॉपर्टी आहेत. आता त्याने नुकतेच अलिबागमध्ये एक आलिशान बंगला खरेदी केला आहे.

रिपोर्ट्सनुसार विराटने अलिबागमधील आवास गावात अलिशान बंगला खरेदी केला असून त्याची किंमत साधारण 6 कोटी रुपये आहे. विशेष म्हणजे अवास वेलनेस या प्रोजेक्टचा विराट ब्रँड अँबेसेडर देखील आहे. याच प्रोजेक्टमध्ये विराटने हा बंगला खरेदी केला आहे. याबद्दल विराटने एक व्हिडिओही शेअर केला आहे.

दरम्यान, अशी माहिती मिळाली आहे की विराट सध्या भारतीय संघासोबत असून ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉर्डर-गावसकर ट्रॉफी ही कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे; त्यामुळे त्याच्यावतीने त्याचा मोठा भाऊ विकास कोहलीने या बंगला खरेदीच्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या.

हा बंगला 2000 चौरस फुटात बांधलेला असून याच्या स्टँप ड्युटीसाठी 36 लाख रुपये खर्च करावे लागले आहेत. या बंगल्यात 400 चौरस फुटाचा स्विमिंग पूलही आहे. याबरोबरच या प्रोजेक्टचे इंटेरियर बॉलिवूड अभिनेते संजय खान यांची मुलगी सुझेन खानने केले आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्याच वर्षी सप्टेंबरमधये विराट आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांनी अलिबागमध्ये जवळपास 19.24 कोटी रुपयांचे फार्महाऊस खरेदी केले होते. तसेच केवळ विराटच नाही, तर भारताचा कर्णधार रोहित शर्मानेही अलिबागमध्ये गुंतवणूक केली असून त्याने म्हत्रोली येथे 4 एकर जागा खरेदी केली आहे.

विराट सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळण्यात व्यस्त आहे. मात्र अद्याप या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात त्याला खास काही करता आलेले नाही. त्याने दोन्ही सामन्यांत मिळून 76 धावा केल्या आहेत.

पण याच मालिकेदरम्यान, त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. तो सर्वात जलद 25 हजार धावा पूर्ण करणाराही खेळाडू बनला आहे. त्याने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 492 सामन्यांमधील 549 डावांमध्ये 53.55 च्या सरासरीने 25012 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याच्या 74 शतकांचा आणि 129 अर्धशतकांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT