Virat Kohli Dainik Gomantak
क्रीडा

क्रिकेटपटू विराट कोहलीने कॉफी व्यवसायात केला प्रवेश

क्रिकेटपटू विराट कोहलीने पॅकेज्ड कॉफी उत्पादन निर्माता कंपनी Rage Coffee मध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे.

दैनिक गोमन्तक

क्रिकेटपटू विराट कोहलीने कॉफी व्यवसायात प्रवेश केला असुन, या व्यवसायाच्या स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवले आहेत. Rage Coffee क्रिकेटपटू विराट कोहलीने पॅकेज्ड कॉफी उत्पादन निर्माता कंपनी Rage Coffee मध्ये गुंतवणूक केली असल्याची माहिती समोर येत आहे. (indian Cricketer Virat Kohli enters coffee business)

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohali) आता कॉफीच्या व्यवसायात उतरला आहे. कोहलीने रेज कॉफी या पॅकेज्ड कॉफी उत्पादने बनवणाऱ्या कंपनीत गुंतवणूक केली आहे. तसेच, रेज कॉफीने (Coffee Company) विराट कोहलीला आपला ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ (Brand Ambassador) बनवले आहे. तथापि, नवी दिल्ली-मुख्यालय असलेल्या स्टार्टअप कंपनीने कोहलीने केलेल्या गुंतवणुकीची रक्कम अद्याप उघड केलेली नाही.

याआधी ऑगस्ट 2021 मध्ये, रेज कॉफीने सिक्थ सेन्स व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील सिरीज ए फंडिंग फेरीचा भाग म्हणून USD 5 दशलक्ष जमा केले होते.

किती केली गुंतवणूक?

रेज कॉफीचे मुख्यालय नवी दिल्ली येथे असुन. कंपनी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही मोडमध्ये विक्री करत आहे. विराट कोहलीने स्टार्टअप कंपनीत किती स्टॉक खरेदी केले आणि किती रक्कम गुंतवली याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. देशभरात आपली उपस्थिती अधिक वाढवण्याची त्यांची योजना असल्याचं रेज कॉफी कंपनीने सांगितले. तसेच कंपनी भांडवल विपणन आणि वितरणासाठी वापरणार असल्याचे रेज कॉफीने माहिती दिली. यासह, उत्पादन वाढविण्यासाठी, नवीन उत्पादने सादर करण्यासाठी आणि वरिष्ठ व्यवस्थापनामध्ये अधिक चांगल्या लोकांना जोडण्यासाठी देखील याचा वापर केला जाणार आहे. यापूर्वी, सिक्स्थ सेन्स व्हेंचर्सच्या नेतृत्वाखालील रेज कॉफीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये 50 लाख दशलक्ष भांडवल उभारले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT