Shardul Thakur Dainik Gomantak
क्रीडा

Shardul Thakur Marriage: 'बॉलिंगही टाकतो क्विक...', शार्दुलचा मितालीसाठी स्पेशल उखाणा; एकदा ऐकाच

Pranali Kodre

Shardul Thakur Marriage: भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याने त्याची गर्लफ्रेंड मिताली परुळकरबरोबर २७ फेब्रुवारी २०२३ रोजी लग्न केले. त्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच आता शार्दुलला लग्नानंतर उखाणा घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

अनेक मराठी कुटुंबात लग्नानंतर वर आणि वधूने उखाणा घेण्याची पद्धत आहे. त्यानुसार शार्दुलनेही मितालीसाठी उखाणा घेतला आहे. त्याने उखाणा घेतला आहे की, 'बॉलिंग टाकतो क्विक, रन पण धावली क्विक, मिताली आमची सुंदरतेचे प्रतीक.'

शार्दुलच्या उखाण्याच्या या व्हिडिओवर सोशल मीडिया युजर्सने अनेक गमतीशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

दरम्यान, शार्दुल आणि मिताली यांचा लग्नसोहळा 27 फेब्रुवारीला कर्जतमध्ये पार पडला. त्यापूर्वी काही दिवस आधीपासूनच त्यांच्या लग्नातील विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. शार्दुलचा त्याच्या हळदीमध्ये झिंगाट गाण्यावर नाचण्याचा व्हिडिओही व्हायरल झाला होता. तसेच त्यांचा संगीत सोहळाही दणक्यात पार पडला होता.

त्यांच्या लग्नातील काही कार्यक्रमांनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा, मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर, वेगवान गोलंदाज दीपक चाहर देखील उपस्थित होते. त्यांच्याव्यतिरिक्त अनेक क्रिकेटपटूंनीही लग्नासाठी हजेरी लावली होती.

साल 2021 मध्ये झालेला साखरपूडा

दरम्यान शार्दुल आणि मिताली यांनी नोव्हेंबर 2021 मध्ये मुंबईत साखरपूडा केला होता. त्यांनतर ते दीड महिन्यांनी लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांचे लग्न मराठमोळ्या पद्धतीने पार पडले.

लग्नानंतर शार्दुल होणार भारतीय संघात सामील

लग्नानंतर आता शार्दुलला पुढील काही दिवसातच भारतीय संघात सामील व्हावे लागणार आहे. त्याची 17 मार्चपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेली आहे.

या वनडे मालिकेनंतर तो आयपीएलमध्ये खेळताना दिसेल. तो यंदाचे आयपीएल 2023 हंगाम कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळणार आहे.

मितालीचा बेकिंगचा व्यावसाय

शार्दूलची पत्नी मिताली ही मुळची कोल्हापूरची आहे. तसेच ती व्यावसायिक असून मुंबईतच तिचा स्वत:चा बेकिंगचा व्यावसाय आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT