Riyan Parag & Mahendra Singh Dhoni Dainik Gomantak
क्रीडा

धोनी-विराटसोबत खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूने वर्णद्वेषाविरोधात उठवला आवाज!

आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडू रियान परागबद्दल (Riyan Parag) बोलले जात आहे, जो एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलाच संतापला आहे.

दैनिक गोमन्तक

वांशिक टिप्पणीचे प्रकरण सध्या क्रिकेट विश्वात गाजत आहे. इंग्लंडची काउंटी टीम यॉर्कशायरवर वांशिक भेदभावाच्या गंभीर आरोपांना सामोरे जावे लागले असून आता एक भारतीय क्रिकेटपटूही वांशिक टिप्पणीमुळे चांगलाच नाराज झाला आहे. आयपीएलमध्ये (IPL) राजस्थान रॉयल्सकडून (Rajasthan Royals) खेळणाऱ्या अष्टपैलू खेळाडू रियान परागबद्दल (Riyan Parag) बोलले जात आहे, जो एका डान्स रिअॅलिटी शोमुळे चांगलाच संतापला आहे.

डान्स दिवाने-3 या रिअॅलिटी शोमध्ये गुंजन सिंग (Gunjan Singh) या आसामच्या तरुणीवर वांशिक टिप्पणी करण्यात आली होती. शोचा अँकर राघव जुयालने आसामच्या गुंजन सिंगला स्टेजवर म्हटले की, जणू ती चीनची आहे. राघव जुयालने (Raghav Juyal) प्रथम चिनी भाषेत काहीतरी सांगितले आणि या मुलीला फोन करण्यापूर्वी चौमीन आणि मोमोजची नावे देखील घेतली. राघव जुयालच्या या व्हिडिओने सोशल मीडियावर खळबळ माजवली असून क्रिकेटर रियान परागने यावर नाराजी व्यक्त केली आहे.

आसाम भारतात आहे - रियान पराग

रियान परागने ट्विट करत म्हटले की, ' भारतात आसाम इतर राज्यांप्रमाणे आहे. या माणसाबद्दल तिरस्कार नाही पण अशी तुलना थांबली पाहिजे. जय हिंद. जय आसाम.

या संपूर्ण वादानंतर शोचा अँकर असलेल्या राघव जुयालने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करुन माफी मागितली आहे. मात्र, राघव जुयालने आपण अजिबात वर्णद्वेषी नसल्याचे स्पष्ट केले. त्याचा हा छोटा व्हिडिओ चुकीच्या पध्दतीने मांडला जात आहे. जुयालच्या म्हणण्यानुसार, त्याने चायनीज हा शब्द वापरला कारण ती मुलगी स्वतः म्हणते की, मला चिनी भाषा येते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Sardesai Congress: काँग्रेसच्या 'हाता'वर पुन्हा विश्वास ठेवायला गोवा फॉरवर्डचा 'नारळ' तयार नाही! पक्षाध्यक्ष विजय सरदेसाई यांचा स्वबळावर लढण्याचा इशारा

Swiggy Warehouse Fraud Goa: बनावट नोंदीद्वारे ‘स्विगी’च्या कर्मचाऱ्यांनीच लुटले गोदाम; 93 लाखांचा ऐवज लांबविला, वेर्णा पोलिसांकडून गुन्हा दाखल

Goa Shipyard Jaigad Project: जयगडकडे 660 एकरवर अत्याधुनिक जहाजबांधणी प्रकल्प; वास्कोत अडथळे, गोवा शिपयार्डचा मोर्चा, जर्मन कंपनीकडे सल्लागाराची धुरा

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

SCROLL FOR NEXT