Virat Kohli | Yuvraj Singh | MS Dhoni | Ashish Nehra Dainik Gomantak
क्रीडा

Indian Cricketer in Goa: गोव्यात सेटल होणाऱ्या 'या' भारतीय क्रिकेटपटूबद्दल माहित आहे का?

भारताचा एक स्टार गोलंदाज निवृत्तीनंतर गोव्यात सेटल झाला आहे.

Pranali Kodre

Ashish Nehra settled in Goa: गोवा हे राज्य भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटण ठिकाणापैकी एक आहे. भारतभरातूनच नाही, तर जगभरातून पर्यटक गोव्यातील निसर्गाचा आणि गोमंतकीय खाद्यसंस्कृतीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. अशातच असा एक भारतीय क्रिकेटपटू आहे, जो आता गोव्यातच स्थायिक झालाय. हा क्रिकेटपटू म्हणजे आशिष नेहरा.

भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहरा आज म्हणजेच 29 एप्रिलला वयाची 44 वर्षे पूर्ण करत आहे. भारतीय संघाचा एक लढवय्या गोलंदाज, विनोदी स्वभावाचा खेळाडू आणि आता आयपीएल विजेत्या गुजराज टायटन्सचा यशस्वी प्रशिक्षक अशी नेहराची ओळख सांगता येऊ शकते.

नेहराने 10 पेक्षा जास्त शस्त्रक्रिया झालेल्या असतानाही 18 वर्षांपेक्षा अधिक काळ भारताकडून क्रिकेट खेळले आहे.

गोव्यात झालाय स्थायिक

तसा नेहराचा जन्म दिल्लीचा. त्याने त्याच्या क्रिकेटचे धडेही दिल्लीत गिरवले. देशांतर्गत क्रिकेटही तो दिल्लीच्या संघाकडून खेळला. पण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मात्र, त्याने निसर्गाच्या सानिध्यात राहण्याला पसंती दिली. त्याचमुळे त्याने गोव्याची निवड केली.

त्याने गोव्यात घरही घेतले आहे आणि तो त्याच्या पत्नी आणि मुलांसह गोव्याला राहायला आला. अनेक रिपोर्ट्सनुसार नेहराने त्याची एक मुलगी आणि एक मुलगा यांना गोव्यातच शाळेतही घातले आहे.

याबद्दल काही वर्षांपूर्वी द क्विंटला दिलेल्या मुलाखतीत नेहराने याबद्दल सांगितले होते. त्याने म्हटसे होते की त्याला अशा ठिकाणी राहायचे आहे, जिथे वातावरण चांगले असेल आणि प्रदुषण कमी असेल. त्यामुळे भारतात राहायचे असेल, तर गोवा चांगसा पर्याय आहे.

त्याचबरोबर त्याने सांगितले होते की हे ठिकाण शांत, सुंदर आहे. तसेच गोव्यात हिरवळ आहे, जी त्याला सर्वात जास्त भावली. गेल्या काही दिवसांमध्ये नेहराने गोव्यातील काही उद्घाटनांना, कार्यक्रमांनाही हजेरी लावलेली होती.

नेहराची कारकिर्द

नेहराने 1999 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत 17 कसोटी सामने खेळताना 44 विकेट्स घेतल्या. तसेच 120 वनडे सामने खेळताना 157 विकेट्स घेतल्या. याशिवाय त्याने 27 आंतरराष्ट्रीय टी20 सामनेही खेळले आहेत. त्याने 34 विकेट्स आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये घेतले आहेत. तसेच त्याने आयपीएलमध्ये 88 सामने खेळले असून 106 विकेट्स घेतल्या आहेत.

त्याने निवृत्तीनंतर समालोचन आणि प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले. तो काहीवर्षे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या कोचिंग स्टाफचाही भाग होता. त्यानंतर 2022 मध्ये गुजरात टायटन्सने त्याला प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले. विशेष म्हणजे त्याच्या मार्गदर्शनाखाली गुजरातने आयपीएलचे विजेतेपदही जिंकले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT