Park Tae-Sang | PV Sindhu Dainik Gomantak
क्रीडा

PV Sindhu: ऑलिम्पिक मेडल जिंकवून देणाऱ्या कोचला सिंधूने हटवले! जाणून घ्या कारण

पीव्ही सिंधू आणि तिचे प्रशिक्षक पार्क ताई-सँग यांचे मार्ग आता वेगळे झाले आहेत. त्यांनी तिला ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदक जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

Pranali Kodre

PV Sindhu: भारतीय संघाची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूने मोठा निर्णय घेतला आहे. तिने तिचे प्रशिक्षक पार्क ताई-सँग यांच्याबरोबरचा करार संपवला आहे. त्यामुळे आता सिंधू आणि पार्क यांचे मार्ग वेगळे झाले आहेत. याबद्दल पार्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.

पीव्ही सिंधूने 2019 अखेरील पार्क यांना प्रशिक्षक म्हणून नेमले होते. त्यानंतर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधून अनेक अविस्मरणीय विजय मिळवले. यातील टोकीयो ऑलिम्पिकमधील कांस्य पदक आणि राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील सुवर्णपदक विजयाचाही समावेश आहे.

पार्क यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधूने ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल पदकाव्यतिरिक्त सईद मोदी इंटरनॅशनल स्पर्धा, स्विस ओपन, सिंगापूर ओपन या स्पर्धाही जिंकल्या.

सिंधूबरोबर मार्ग वेगळा झाल्यानंतर दक्षिण कोरियाच्या पार्क यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले आहे की 'मी काही दिवसांपूर्वीच हैदराबादमधून परत आलो. मला माझ्या वडिलांबद्दल चौकशी केलेल्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. खरं सांगायचे तर माझ्या वडिलांची तब्येत सध्या फारशी बरी नाही. त्यामुळे मला पुन्हा भारतात जाणे कठीण झाले होते.'

'अनेक लोकांनी माझ्या सिंधूबरोबरील नात्याबद्दल विचारले. तर तिने गेल्या काही सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केली आणि एक प्रशिक्षक म्हणून मी स्वत:ला जबाबदार मानतो. त्यामुळे तिला बदल हवा होता. तिने सांगितले की ती नवीन प्रशिक्षक शोधणार आहे. मी तिच्या निर्णयाचा सन्मान केला. मी माफी मागतो की मी तिच्याबरोबर पुढील ऑलिम्पिकपर्यंत नसेल. पण मी आता तिला दुरून पाठिंबा देईल. तिच्याबरोबरी प्रत्येक क्षण लक्षात राहिल. मला पाठिंबा देणाऱ्या आणि प्रेरणा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो.'

पार्क हे माजी बॅडमिंटनपटू देखील आहेत. त्यांनी सुदीरमन कप स्पर्धेत मिश्र दुहेरी प्रकारात दोन कांस्य पदक जिंकले आहेत. तसेच त्यांनी 2002 साली एशियन गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. त्यांनी 2013 पासून प्रशिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले.

आता यापुढे सिंधू सुचित्रा ऍकेडमीमध्ये ट्रेनिंग घेईल. तिला इथे माजी ऑल-इंग्लंड चॅम्पियन हाफिज हाशिम यांचे मार्गदर्शन मिळेल. मलेशियाचे हाशिम तिला मदत करणार असल्याचे सुचित्रा ऍकेडमीचे प्रमुख प्रदीप राजू यांनी स्पष्ट केले आहे. सिंधूला आता पुढील महिन्यात ऑल-इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा खेळायची आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT