Virender Sehwag & Shoaib Akhtar Dainik Gomantak
क्रीडा

World Cup 2023: 'शोएब भाई ना इश्क में, ना प्यार में...', विरुने घेतली शोएब अख्तरची मजा!

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला.

Manish Jadhav

World Cup 2023: एकदिवसीय विश्वचषकातील सर्वात हाय-व्होल्टेज सामन्यात भारताने पाकिस्तानचा 7 गडी राखून पराभव केला. भारताने हा सामना अवघ्या 30.3 षटकांत जिंकला. या विजयासह भारत विश्वचषक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे.

भारताने तिसऱ्या स्थानावरुन थेट पहिल्या स्थानावर झेप घेतली. या विजयासह भारताने प्रथम क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडला मागे टाकले. यावेळी भारताचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने पाकिस्तानींची चांगलीच मजा घेतली.

आम्ही सर्वांची काळजी घेतो - वीरेंद्र सेहवाग

वीरेंद्र सेहवागने ट्विट करुन सांगितले की, 'आमचं आदरातिथ्य वेगळं आहे. आम्ही सर्व पाकिस्तानी खेळाडूंना फलंदाजीची संधी दिली.

आम्ही सर्वांची काळजी घेतो.' भारताच्या ग्रेट गोलंदाजांनी पाकिस्तानी खेळाडूंना ऑलआऊट केले, यासाठी सेहवागने पाकिस्तानी खेळाडूंसोबत मस्ती केली. सेहवाग पुढे म्हणाला की, 'भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानी फलंदाजांना लवकरात लवकर आऊट करण्याचा चंग बांधला होता.'

यानंतर सेहवाग शोएब अख्तरची (Shoaib Akhtar) आठवण काढत म्हणाला की, पाकिस्तानी दबाव सहन करु शकत नाहीत. सेहवाग शेवटी म्हणाला की, ''शोएब भाई ना इश्क में, ना प्यार में, जो मजा है पाकिस्तान की 8-0 की हार में!''

पाकिस्तानविरुद्ध 6 षटकार ठोकले

दरम्यान, रोहितने पाकिस्तानविरुद्ध (Pakistan) 62 चेंडूत 86 धावा केल्या. यादरम्यान रोहितने आपल्या इनिंगमध्ये 6 चौकार आणि 6 षटकार मारले.

दुसरीकडे, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पाकिस्तान संघाने 42.5 षटकांत सर्व विकेट गमावून केवळ 191 धावा केल्या होत्या. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांचे योगदान दिले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT