India won 27 medals in Asian Athletics Championships 2023: थायलंड येथे झालेल्या एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप स्पर्धेत यंदा भारतीय संघाने दमदार कामगिरी नोंदवली आहे. या स्पर्धेत भारताने 27 पदकांची कमाई केली. यामध्ये 6 सुवर्णपदके, 12 रौप्य पदके आणि 9 कांस्यपदकांचा समावेश आहे.
ही भारताची या स्पर्धेतील परदेशात नोंदवलेली सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. याआधी भुवनेश्वर येथे 2017 मध्ये भारताने 27 पदके जिंकली होती. यामध्ये ९ सुवर्णपदकांचा समावेश आहे.
दरम्यान एशियन ऍथलेटिक्स चॅम्पियनशीप 2023 स्पर्धेत भारत 27 पदकांसह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत अव्वल क्रमांक जपानने पटकावला. जपानने 16 सुवर्णपदकांसह एकूण 37 पदके जिंकली. तसेच चीन दुसऱ्या क्रमांकावर राहिला. चीनने 8 सुवर्णपदकांसह 22 पदके जिंकली.
या स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताने 13 पदके जिंकली. यात 8 रौप्य आणि 5 कांस्य पदके जिंकली.
भारताकडून विकास सिंग आणि प्रियांका यांनी 20 किमी चालण्याच्या शर्यतीत पदके जिंकत अखेरच्या दिवसाची सुरुवात चांगली करुन दिली होती. प्रियांकाने 1 तास 34 मिनिटे, 24 सेकंद वेळ नोंदवत रौप्य पदक आणि विकासने 1 तास 29 मिनिटे, 33 सेकंद वेळ नोंदवत कांस्यपदक जिंकले.
तसेच 800 मीटरच्या शर्यतीत पुरुषांच्या हरियाणाच्या क्रिशन कुमारने 1 मिनिट 45.88 सेकंदाची वेळ नोंदवत रौप्य पदक नावावर केले, याशिवाय केम चंदा हिने महिलांच्या शर्यतीत 2 मिनिटे 1.58 सेंकदाची वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकले.
दरम्यान भारताने 20 किमी चालण्याच्या शर्यतीत आणि महिलांच्या गोळाफेक स्पर्धेत पहिल्यांदाच पदक जिंकण्याचा कारनामा केला. महिला गोळाफेक स्पर्धेत आभा खटुआ हिने तिच्या चौथ्या प्रयत्नात 18.06 मीटर अंतरावर गोळा फेकला. यामुळे तिने रौप्यपदक जिंकले. तसेच मनप्रीत कौरने 17 मीटरचे अंतर कापत कांस्यपदक जिंकले.
ज्योती यार्राजी - महिला 10 मीटर हर्डल
अब्दुल्ला बुबाकर - पुरुष ट्रिपल जम्प
पारुल चौधरी - महिला 3000 मीटर
अजय कुमार सरोज - पुरुष 1500 मीटर
तेजिंदरपाल सिंग तूर - पुरुष गोळाफेक
4x400 मीटर रिले मिश्र संघ
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.