India Women Cricket Dainik Gomantak
क्रीडा

India Women Cricket: महिला संघाचा डाव घसरला; 96 धावांत सात खेळाडू बाद; पहिल्या डावात 285 धावा

India Women vs England Test: जेमिमा रॉड्रिग्ज व स्मृती मानधना या जोडीने स्थिरावणाचा प्रयत्न केला. मात्र इसी वोंगच्या बाहेरच्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्ज त्रिफळाचीत झाली

दैनिक गोमन्तक डिजिटल

लॉर्डस: भारतीय महिला क्रिकेट संघाचा पहिला डाव लॉर्डस येथील एकमेव कसोटीत घसरला. तीन बाद १८९ या धावसंख्येवरुन भारतीय संघाला पहिल्या डावात २८५ धावांपर्यंतच मजल मारता आली. धावफलकावर १९० धावा झाल्या असताना स्मृती मानधना ८३ धावसंख्येवर बाद झाली. त्यानंतर ९६ धावांमध्ये भारतीय संघाने सात फलंदाज बाद गमावले.

इंग्लंडने भारताचा पहिला डाव २८५ धावांवर गुंडाळून कसोटीतील पहिला दिवस गाजवला. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. लॉरेन फिलरच्या गोलंदाजीवर शेफाली वर्मा शून्यावरच पॅव्हेलियनमध्ये परतली. त्यानंतर लॉरेन बेलच्या अफलातून चेंडूवर यास्तिका भाटीयाचा त्रिफळा १२ धावांवरच उडाला.

जेमिमा रॉड्रिग्ज व स्मृती मानधना या जोडीने स्थिरावणाचा प्रयत्न केला. मात्र इसी वोंगच्या बाहेरच्या चेंडूवर जेमिमा रॉड्रिग्ज त्रिफळाचीत झाली. तिने ३५ धावा केल्या. उपकर्णधार स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर या जोडीने अनुभव पणाला लावत खेळपट्टीवर ठाण मांडला. दोघींनी ८९ धावांची भागीदारीही रचली.

ही जोडी इंग्लंडसाठी डोकेदुखी ठरतेय असे वाटत असतानाच इसी वोंगच्या गोलंदाजीवर स्मृती मानधनाने आणखी एका बाहेरच्या चेंडूवर विकेट गमावली. तिने आपली खेळी ११ चौकार व एक षटकाराने सजवली. भारतीय धावसंख्येत १२ धावांची भर पडताच हरमनप्रीत कौर ही देखील बाद झाली. मॅडी विलिएयर्स हिच्या आत येत असलेल्या चेंडूवर ती त्रिफळाचीत झाली. हरमनप्रीत कौरने सात चौकारांसह ५८ धावांची खेळी केली.

दीप्ती शर्मा हिने या डावात अर्धशतकी खेळी करीत भारतासाठी मोलाची कामगिरी बजावली. तिने सात चौकारांसह ५७ धावांची खेळी केली. सहकारी पॅव्हेलियनमध्ये परतत असताना तिने छान खेळी साकारली. सोफी एक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर ती बाद झाली. भारताचा पहिला डाव २८५ धावांवर आटोपला.

इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोन हिने ६८ धावा देत तीन फलंदाज बाद केले. संक्षिप्त धावफलक : भारत ः पहिला डाव ७४.५ षटकांत सर्व बाद २८५ (स्मृती मानधना ८३, यास्तिका भाटीया १२, जेमिमा रॉड्रिग्ज ३५, हरमनप्रीत कौर ५८, दीप्ती शर्मा ५७, रिचा घोष १३, स्नेह राणा १३, सोफी एक्लेस्टोन ३/६८, लॉरेन फिलर २/४०, इसी वोंग २/४१, मॅडी विलिएयर्स २/७९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Strait of Hormuz: मोठी बातमी! स्ट्रेट ऑफ होर्मुजमध्ये व्यापारी जहाजावर भीषण हल्ला; 11 भारतीय जखमी

VIDEO: 'तो' कॅच अन् मैदानात गोंधळ! LIVE सामन्यात टीम इंडियाच्या खेळाडूंची जोरदार टक्कर; व्हिडिओ तूफान व्हायरल

Israel Election 2026: इस्राईलमध्ये 27 ऑक्टोबरला राजकीय रण; नेतान्याहूंसमोर आयसेनकोटांचे आव्हान, युद्धाच्या सावटात सत्तेसाठी 61 जागांचे गणित निर्णायक

Nobel Prize 2026 In Physics: फ्रान्सिस हॅल्जेन यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर, न्यूट्रिनो संशोधनावर शिक्कामोर्तब!

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

SCROLL FOR NEXT