Sai Sudharsan ICC
क्रीडा

SA vs IND, ODI: टीम इंडियाने द. आफ्रिकेला दिवसा दाखवले तारे! पहिल्या वनडेत मिळवला सोपा विजय

South Africa vs India, 1st ODI: भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली आहे.

Pranali Kodre

South Africa vs India, 1st ODI at Johannesburg:

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील वनडे मालिकेला रविवारपासून (17 डिसेंबर) सुरुवात झाली. पहिला वनडे सामना जोहान्सबर्गमधील न्यू वाँडरर्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने 8 विकेट्सने विजय मिळवला आणि मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारतासमोर 117 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग भारताने 2 विकेट्स गमावत 16.4 षटकात सहज पूर्ण केला. भारताकडून पदार्पणवीर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी केली.

या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 117 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि साई सुदर्शन उतरले होते. मात्र, दक्षिण आफ्रिकेने चौथ्या षटकात घेतलेल्या अचूक डीआरएसमुळे ऋतुराज गायकवाडला 5 धावांवर पायचीत व्हावे लागले.

मात्र, त्यानंतर साई सुदर्शन आणि श्रेयस अय्यर यांनी दमदार फलंदाजी करत भारताला 100 धावांचा टप्पा पार करून दिला. दरम्यान, दोघांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पण, भारताला विजयासाठी ६ धावांची गरज असताना श्रेयस 45 चेंडूत 52 धावांची खेळी करून बाद झाला.

अखेरीस साई सुदर्शन आणि तिलक वर्माने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. साई सुदर्शनने 43 चेंडूत 55 धावांची नाबाद खेळी केली. तसेच तिलकने १ धाव केली.

दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत विआन मुल्डर आणि अँडिल फेहलुक्वायो यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

तत्पुर्वी, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दक्षिण आफ्रिकेला सुरुवातीलाच अर्शदीप सिंगने मोठे धक्के दिले. त्यानंतर मधली फळी आवेश खानने उद्धस्त केली. त्यातून दक्षिण आफ्रिकेला सावरता आले नाही.

दक्षिण आफ्रिकेकडून अँडील फेहलुक्वायोने सर्वाधिक 33 धावांची खेळी केली, तसेच टोनी दे झोर्झीने 28 धावा केल्या. यांच्याव्यतिरिक्त कोणालाही 20 धावांचा टप्पा पार करता आला नाही. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा डाव 27.3 षटकात 116 धावांवर संपुष्टात आला.

भारताकडून अर्शदीप सिंगने 5 विकेट्स घेतल्या, तर आवेश खानने 4 विकेट्स घेतल्या. तसेच एक विकेट कुलदीप यादवने घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT