Rohit Sharma  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: दुसऱ्या वनडेत टीम इंडियाचा 'हा' धाकड ठरणार लंकेचा कर्दनकाळ, रोहीत देणार संधी!

India vs Sri Lanka, 2023: दुसरा एकदिवसीय सामना जिंकून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर कब्जा करेल.

दैनिक गोमन्तक

India vs Sri Lanka, 2st ODI: भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना उद्या दुपारी 1.30 वाजता कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. दुसरा एकदिवसीय सामना जिंकून, रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेवर कब्जा करेल.

मालिका जिंकण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मोठा बदल करेल आणि प्लेइंग इलेव्हनमध्ये घातक खेळाडूला परत आणेल. हा खेळाडू दुसऱ्या वनडेत श्रीलंका संघाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचेही सिद्ध होईल.

दुसऱ्या वनडेत श्रीलंकेच्या सर्वात मोठ्या शत्रूची होणार एन्ट्री!

जर रोहित शर्माने (Rohit Sharma) दुसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये या धोकादायक खेळाडूला संधी दिली तर तो आपल्या कामगिरीने श्रीलंकेच्या संघाचा नाश करु शकतो. हा धोकादायक खेळाडू दुसरा कोणी नसून चायनामन स्पिनर कुलदीप यादव आहे. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेसाठी टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये रोहित शर्मा कुलदीप यादवला संधी देणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 2-2 हॅट्ट्रिक घेण्याचा विक्रमही कुलदीप यादवच्या नावावर आहे.

दुसरीकडे, भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळवला जाईल, जिथे कुलदीप यादवने त्याच्या ODI कारकिर्दीतील पहिली हॅट्ट्रिक केली होती. 21 सप्टेंबर 2017 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या या एकदिवसीय सामन्यात कुलदीप यादवने हॅटट्रिक केली होती.

यादरम्यान, कुलदीप यादवने (Kuldeep Yadav) ऑस्ट्रेलियन फलंदाज मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांना बाद करुन वनडेतील पहिली हॅट्ट्रिक साधली. पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने यजुवेंद्र चहलला संधी देऊन स्वतःच्या पायावर दगड मारुन घेतला.

दुसऱ्या वनडेसाठी अशी असू शकते टीम इंडियाची प्लेइंग 11:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी आणि उमरान मलिक.

भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिका

  • पहिला एकदिवसीय, 10 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, गुवाहाटी

  • दुसरी वनडे, 12 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, कोलकाता

  • तिसरा एकदिवसीय, 15 जानेवारी, दुपारी 1.30 वाजता, तिरुअनंतपुरम

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT