Arshdeep Singh Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SL: ... म्हणून अर्शदीप सिंग पहिल्या टी20 सामन्याचा भाग नाही, BCCI कडून कारण स्पष्ट

अर्शदीप सिंग श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 साठी उपलब्ध नाही.

Pranali Kodre

Arshdeep Singh: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात मंगळवारपासून तीन सामन्यांच्या टी20 मालिकेला सुरुवात झाली. या मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकली असून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यासाठी वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग प्लेइंग इलेव्हनमध्ये निवडीसाठी उपलब्ध नव्हता.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार अर्शदीप सिंग हा श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20साठी उपलब्ध नाही, कारण तो आजारातून पूर्णपणे बरा झालेला नाही. दरम्यान, त्याला कोणता आजार झाला आहे, याबद्दल बीसीसीआयने माहिती दिलेली नाही.

भारतीय संघाकडून दोघांचे पदार्पण

अर्शदीप निवडीसाठी उपलब्ध नसला, तरी या सामन्यातून भारतीय क्रिकेट संघाकडून शुभमन गिल आणि शिवम मावी यांचे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले आहे. शुभमन भारताकडून टी20 खेळणारा 100 वा आणि शिवम 101 वा खेळाडू ठरला.

दरम्यान, शिवम मावीचे हे आंतरराष्ट्रीय पदार्पण देखील ठरले आहे. त्यामुळे तो भारताकडून क्रिकेट सामना खेळणारा 391 वा खेळाडू ठरला आहे.

शुभमन गिलने यापूर्वी भारताकडून कसोटी आणि वनडे क्रिकेट खेळले आहे. त्याने या दोन्ही क्रिकेट प्रकारासाठी भारतीय संघात त्याची जागाही जवळपास पक्की केली आहे. आता त्याला टी20 मध्ये भारतीय संघाकडून चांगली कामगिरी करत स्वत:ची प्रतिभा सिद्ध करण्याची संधी आहे.

(Arshdeep Singh wasn't available for selection for the 1st T20I against Sri Lanka)

हार्दिक पंड्या कर्णधार

भारत विरुद्ध श्रीलंका टी20 मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारख्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे या मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद हार्दिक पंड्याकडे आणि उपकर्णधारपद सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आले आहे.

पहिल्या टी20 सामन्यासाठी भारताची प्लेइंग इलेव्हन -

इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या (कर्णधार), दीपक हुडा, अक्षर पटेल, हर्षल पटेल, शिवम मावी, उमरान मलिक, युजवेंद्र चहल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Nuclear Weapons Report 2026: भारताच्या अण्वस्त्रांबाबत अमेरिकन संस्थेचा मोठा दावा! भारतीय शस्त्रागारात 190 अण्वस्त्रे, क्षेपणास्त्रांचे वेगाने आधुनिकीकरण सुरु

Duleep Trophy Winner 2026: 13 वर्षांनंतर चॅम्पियनशिपचा महासंग्राम जिंकला! ईस्ट झोनने जिंकली दुलीप ट्रॉफी; ईशान किशन ठरला विजयाचा 'हिरो' VIDEO

Canacona Coarse Farming: पावसाने ऐन पेरणीच्या काळात दिला दगा; काणकोणातील भरड शेतीला मोठा फटका, 2520 हेक्टरपैकी मोठ्या क्षेत्रावर पेरणीच नाही

Goa Politics: 'गोवा फर्स्ट' 2027चा नवा राजकीय पर्याय ठरणार? सरदेसाईंचे संकेत; काँग्रेससोबतची युतीची बोलणी सध्या स्थगित

Houthi Missile Attack Saudi Arabia: हुतींच्या सौदीवरील हल्ल्याने बिथरला पाकिस्तान, इराणला दिली तंबी; मुस्लीम जगतात खळबळ

SCROLL FOR NEXT