Sai Sudarshan  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs SA: साई सुदर्शनला पहिल्यांदाच मिळाली टीम इंडियात संधी, आफ्रिकेविरुद्ध करु शकतो डेब्यू!

India vs South Africa: बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे.

Manish Jadhav

India vs South Africa: बीसीसीआयने आज दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. या दौऱ्यावर टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेसोबत कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये मालिका खेळायची आहे. बीसीसीआयने या तिन्ही फॉरमॅटसाठी वेगवेगळे कर्णधार निवडले आहेत. रोहित शर्मा कसोटीत, केएल राहुल एकदिवसीय आणि सूर्यकुमार यादव टी-20 मध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करताना दिसणार आहे. या दौऱ्यासाठी युवा खेळाडू साई सुदर्शनलाही प्रथमच संघात स्थान मिळाले आहे. साई सुदर्शनचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे.

साई सुदर्शन दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पदार्पण करु शकतो

आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या साई सुदर्शनला पहिल्यांदाच टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आहे. त्याचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. आता साई सुदर्शन टीम इंडियासाठी वनडे पदार्पण करण्यासाठी सज्ज झाला आहे. गुजरात टायटन्सने 2022 मध्ये साई सुदर्शनचा त्यांच्या संघात समावेश केला होता. सुदर्शनने आतापर्यंत आयपीएलमध्ये 13 सामने खेळले असून त्यात त्याने 507 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने आपल्या बॅटने 4 अर्धशतके झळकावली असून आयपीएलमधील त्याची सर्वोत्तम धावसंख्या 96 धावा आहे.

प्रथम श्रेणी आणि लिस्ट अ क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी

साई सुदर्शनचा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्येही चांगला रेकॉर्ड आहे. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 11 सामने खेळले असून 19 डावात त्याने 829 धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याने 2 शतके आणि 3 अर्धशतके झळकावली आहेत. तर SAI चा सर्वोत्तम स्कोअर 179 धावा होता. याशिवाय, त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 22 सामने खेळले असून 1236 धावा केल्या आहेत. या काळात त्याने आपल्या बॅटने 6 शतके आणि 4 अर्धशतके झळकावली आहेत.

टीम इंडियाचा एकदिवसीय संघ

केएल राहुल (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, तिलक वर्मा, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, रजत पाटीदार, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, दीपक चहर, आवेश खान, यजुवेंद्र चहल, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

3 वनडे

पहिला वनडे सामना - 17 डिसेंबर (जोहान्सबर्ग)

दुसरा वनडे सामना- 19 डिसेंबर (केबेरा)

तिसरा वनडे सामना- 21 डिसेंबर (पार्ल)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडला 'हा' चमत्कारीक रेकॉर्ड; रोहित-प्रसिद्ध कृष्णाचा मोठा धमाका! VIDEO

"काम लवकर पूर्ण करा, नाहीतर..."; सांकवाळमध्ये आंदोलनाचा उडणार भडका; एमईएस कॉलेजजवळील रस्ते कामातील विलंबावर नागरिकांचा संताप

Pakistan Bomb Blast: 'पहिला स्फोट झाला अन् मदत करायला गेले...', पाकिस्तानात बॅक-टू-बॅक धमाके; 7 जणांचा मृत्यू, 3 गंभीर जखमी

Goa Coal Mining: "गोव्यातून कोळसा हद्दपार करा!", गोवा फॉरवर्डने फुंकले आंदोलनाचे रणशिंग; सरकारला दिला थेट इशारा

Bangladesh Hindu Protest: "प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेवर बूट ठेवून केली विटंबना..."; इस्लामिक कट्टरपंथियांविरोधात बांगलादेशात हिंदूंचा महाआक्रोश VIDEO

SCROLL FOR NEXT