Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND Vs SA, T20I Series: आफ्रिकेविरुद्ध टीम इंडियाचा रेकॉर्ड लयच भारी; टी-20 फॉरमॅटमध्ये...

India vs South Africa, T20I Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ब्लू संघाला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये यजमान संघाचा सामना करावा लागणार आहे.

Manish Jadhav

India vs South Africa, T20I Series: भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. ब्लू संघाला क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये यजमान संघाचा सामना करावा लागणार आहे. या दौऱ्याची सुरुवात तीन सामन्यांच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेने होईल. अशा स्थितीत मालिका सुरु होण्यापूर्वी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 फॉरमॅटमध्ये आतापर्यंतचा रेकॉर्ड कसा आहे याबद्दल बोलूया...

T20 फॉरमॅटमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका सामना:

भारत आणि दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघामध्ये आतापर्यंत एकूण 24 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. इथे भारतीय संघाला आफ्रिकन संघाविरुद्ध थोडासा फायदा झाल्याचे दिसते. प्रोटीज संघाविरुद्ध 13 सामन्यांत ब्लू संघाला यश मिळाले आहे. तर प्रोटीज संघाने ब्लू संघाविरुद्ध 10 सामने जिंकले आहेत. याशिवाय, एक सामना अनिर्णित राहिला.

भारत विरुद्ध आफ्रिका टी-20 मालिकेत रोहित-मिलर चमकले:

दरम्यान, रोहित शर्मा आणि डेव्हिड मिलर यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 द्विपक्षीय मालिकेत प्रभावी कामगिरी केली आहे. इथे रोहित भारतीय संघासाठी सर्वाधिक धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. तर विरोधी संघाकडून सर्वाधिक धावा डेव्हिड मिलरने केल्या आहेत. रोहित शर्माने 2007 पासून आफ्रिकेविरुद्धच्या द्विपक्षीय मालिकेत 17 सामन्यांमध्ये भाग घेतला आहे. दरम्यान, त्याने आपल्या बॅटने 16 डावांत 28.00 च्या सरासरीने 420 धावा केल्या आहेत. विरोधी संघाच्या विपरीत, मिलरने 2011 पासून 18 सामने खेळले आहेत आणि 15 डावात 47.37 च्या सरासरीने 379 धावा केल्या आहेत.

भुवनेश्वर कुमारने आफ्रिकेविरुद्ध T20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम भुवनेश्वर कुमारच्या नावावर आहे. कुमारने इथे 12 सामन्यात भाग घेत सर्वाधिक 14 विकेट घेतल्या आहेत. मात्र, आगामी दौऱ्यासाठी त्याचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला नाही.

आफ्रिकन भूमीवर भारताची कामगिरी:

2006-07: भारत 1-0 ने जिंकला

2007 विश्वचषक: भारत जिंकला

2010-11: भारत 1-0 ने जिंकला

2011-12: द. आफ्रिका 1-0 ने जिंकली

2017-18: भारत 2-1 ने जिंकला

वेळापत्रक:

10 डिसेंबर 1ला T20, डर्बन, संध्याकाळी 7.30 वा

12 डिसेंबर, दुसरी T20, पोर्ट एलिझाबेथ, रात्री 8.30 वा

14 डिसेंबर, 3रा T20, जोहान्सबर्ग, रात्री 8.30 वा

T20 मालिकेसाठी दोन्ही संघ

भारत: यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, ईशान किशन (यष्टीरक्षक), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा, रवी बिश्नोई, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि दीपक चहर.

दक्षिण आफ्रिका: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, मॅथ्यू ब्रिट्झके, आंद्रे बर्गर, गेराल्ड कोएत्झी (पहिली आणि दुसरी टी20), डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅन्सेन (पहिली आणि दुसरी टी20), हेन्रिच क्लासेन, केशव महाराज, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी (पहिली आणि दुसरी टी20), अँडिले फेहलुकवायो, तबरेझ शम्सी, ट्रिस्टन स्टब्स आणि लिझाद विल्यम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT