India vs South Africa ANI
क्रीडा

World Cup 2023: भारत की द. आफ्रिका, कोलकाताची खेळपट्टी कोणाला करणार मदत? कसे असेल हवामान, घ्या जाणून

India vs South Africa: भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात कोलकाताला रविवारी सामना होणार आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs South Africa, Kolkata Weather Rain Updates:

वनडे वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील ३७ वा सामना भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात होणार आहे. हा सामना रविवारी (५ नोव्हेंबर) कोलकातामधील इडन गार्डन्सवर रंगणार असून दुपारी २ वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे.

महत्त्वाचे म्हणजे या दोन्ही संघांनी यापूर्वीच उपांत्य फेरीत प्रवेश पक्का केला आहे. पण गुणतालिकेत अव्वल क्रमांक मिळवण्यासाठी या सामन्यादरम्यान दोन्ही संघात चढाओढ असेल. पण याचदरम्यान कोलकातामधील हवामान कसे असेल, अशा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला असेल. कारण शनिवारी बंगळुरुला झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पावसाचा मोठा अडथळा आला होता. त्याचमुळे असा अडथळा कोलकातामध्येही येणार का, याची चिंता अनेकांना सतावत असेल.

रविवारी AccuWeather च्या रिपोर्टनुसार कोलकातामध्ये धुके पडू शकते. तसेच पावसाची शक्यता अगदीच नगण्य आहे. त्यामुळे या सामन्यात पावसाचा अडथळा येण्याची शक्यता फारशी नाही. पण ढगाळ वातावरण राहू शकते. ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असेल. त्याचबरोबर हवेत ५१ टक्क्याच्या आसपास आद्रता असेल. तापमान २३ ते ३३ डीग्री सेल्सियसच्या आसपास असू शकते.

कशी असेल खेळपट्टी

ईडन गार्डन्सवरील खेळपट्टी ही फलंदाजीला पोषक मानली जाते. त्यामुळे रविवारी दोन्ही संघांची तगडी फलंदाजी पाहातो मोठ्या धावसंख्येचा सामना होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र, याशिवाय ही खेळपट्टी फिरकी गोलंदाजांनीही मदत करताना यापूर्वी दिसली आहे, त्यामुळे या सामन्यात फिरकीपटूंचे योगदानही महत्त्वाचे ठरू शकते.

आत्तापर्यंत या मैदानावर वर्ल्डकप २०२३ स्पर्धेतील दोन सामने खेळवण्यात आले आहेत. यातील नेदरलँड्सने बांगलादेशला ८७ धावांनी पराभूत केले आहे, तर पाकिस्तानने बांगलादेशला ७ विकेट्सने पराभूत केले आहे.

असे आहेत दोन्ही संघ -

  • भारत - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, आर अश्विन, इशान किशन, सूर्यकुमार यादव, प्रसिद्ध कृष्णा.

  • दक्षिण आफ्रिका - तेंबा बाऊमा (कर्णधार), गेराल्ड कोएत्झी, क्विंटन डी कॉक, रिझा हेंड्रिक्स, मार्को यान्सिन, हेन्रिक क्लासेन, केशव महाराज, एडेन मार्करम, डेव्हिड मिलर, लुंगी एन्गिडी, कागिसो रबाडा, ताब्राईज शम्सी, रस्सी वॅन दर द्युसेन, अँडी फुलेकवायो, लिझाड विलियम्स.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant: ऋषभ पंतने सोडले लखनऊ सुपर जायंट्सचे कर्णधारपद! अपयशाची स्वीकारली संपूर्ण जबाबदारी; पण संघात राहणार का?

NEET Paper Leak: 'फक्त बळीचा बकरा बनवून चालणार नाही, खऱ्या मास्टरमांइडला शोधा'; सर्वोच्च न्यायालयाची केंद्र सरकार आणि NTA ला सक्त ताकीद

Budh Gochar 2026: गुंतवणुकीतून बंपर नफा आणि परदेश प्रवासाचा योग! बुधाचे गोचर ठरणार वरदान; 3 राशींवर होणार पैशांचा पाऊस

VIDEO: अंदाज चुकला की चपलेचा सणसणीत दणका! सोशल मीडियावर अतरंगी गेमचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी हसून हसून लोटपोट

स्मार्ट चष्म्यांच्या वापरातून फिक्सिंग... आयपीएल फायनलपूर्वी खळबळ, BCCI ॲक्शन मोडमध्ये! 'या' गोष्टीवर घातली बंदी

SCROLL FOR NEXT