Team India | India vs Australia Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: उनाडकट पाठोपाठ 'हा' धाकड फलंदाजही दुसऱ्या कसोटीतून आऊट, तर बुमराहचे कमबॅकही लांबणीवर

भारताचा प्रमुख फलंदाज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला असून जसप्रीत बुमराहच्या पुनरागमनासाठीही चाहत्यांना अजून प्रतिक्षा करावी लागण्याची शक्यता आहे.

Pranali Kodre

India vs Australia: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात सध्या 4 सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने जिंकला आहे. आता दुसरा सामना 17 मार्चपासून दिल्लीला होणार आहे. पण या सामन्यातून मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर बाहेर जाण्याची शक्यता दाट आहे. तसेच जसप्रीत बुमराहचेही आंतरराष्टीय पुनरागमन आणखी लांबण्याची शक्यता आहे.

रिपोर्ट्सनुसार अद्याप श्रेयस त्याच्या पाठीच्या दुखापतीतून सावरत आहे. तो यासाठी बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये त्याच्या दुखापतीवर काम करत आहे. या दुखापतीमुळे त्याला पहिल्या कसोटीलाही मुकावे लागले होते. पण तो दुसऱ्या कसोटीत पुनरागमन करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती.

मात्र, भारतीय संघव्यवस्थापन त्याला लगेचच आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळवण्याची जोखीम खेळण्याची शक्यता कमी आहे. तो या दुखापतीमुळे जवळपास एक महिन्यापासून क्रिकेट खेळलेला नाही. त्यामुळे त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये आधी त्याची तंदुरुस्ती सिद्ध करण्यास सांगितले जाऊ शकते.

त्यामुळे आता हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल की त्याला चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समीती श्रेयसला 1 मार्चपासून होणाऱ्या इराणी ट्रॉफी स्पर्धेत खेळायला लावणार का? यापूर्वी रविंद्र जडेजाला देखील रणजी ट्रॉफीमधील सामना खेळण्यास सांगण्यात आले होते.

बुमराहचे पुनरागमन लांबले

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह सप्टेंबर 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. त्याला स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने त्यातून तो अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे आगामी वनडे वर्ल्डकप आणि भारतीय संघ जर कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचला, तर तो सामना लक्षात घेता त्याच्याबाबतीत संघव्यवस्थापनाला जोखीम घ्यायची नाही.

त्याचमुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेबरोबर त्यानंतर होणाऱ्या वनडे मालिकेलाही मुकण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बुमराहचे पुनरागमन आयपीएल २०२३ हंगामात मुंबई इंडियन्सकडून होण्याची शक्यता आहे.

ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका 13 मार्च रोजी संपणार आहे. त्यानंतर 17 ते 22 मार्च दरम्यान भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यानंतर आयपीएल 2023 चा हंगाम सुरू होण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Harmanpreet Kaur Captaincy: हरमनप्रीत कौरने अचानक कर्णधारपद का सोडलं? एशियन गेम्समध्ये गोल्ड जिंकूनही निर्णय; BCCIच्या 'त्या' बैठकीत काय चर्चा झाली?

Aadhaar Card New Rule: UIDAI ने बदलले आधार कार्डमधील नाव सुधारण्याचे नियम, नागरिकांना मोठा दिलासा; नवीन गाइडलाईन्स जारी

Sourav Ganguly Head Coach: दिल्ली कॅपिटल्सचा मोठा निर्णय! सौरव गांगुली बनले नवे हेड कोच; 'दादा' आता 'DC'ला मिळवून देणार पहिली IPL ट्रॉफी?

Shadashtak Yog 2026: कामाच्या ठिकाणी वाद आणि आर्थिक फटका! जीवनात खळबळ माजवणार षडाष्टक योग; 'या' 5 राशींच्या आयुष्यात येणार मोठं तुफान

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

SCROLL FOR NEXT