Suryakumar Yadav reaction on Rohit Sharma Century Dainik Gomantak
क्रीडा

Rohit Sharma Video: आता चौथं द्विशतक... हिटमॅनने शतक करताच सूर्यकुमारच्या रिऍक्शनने वेधले लक्ष

रोहित शर्माने शतक केल्यानंतर सूर्यकुमारने दिलेली प्रतिक्रिया चर्चेचा विषय ठरला होता.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd ODI: मंगळवारी भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिकेतील तिसऱ्या सामन्यात 90 धावांनी विजय मिळवला. या विजयासह मालिकाही 3-0 अशी जिंकली. भारताच्या या विजयात कर्णधार रोहित शर्मानेही शतकी खेळी करत मोलाचा वाटा उचलला. दरम्यान, त्याने शतक केल्यानंतर सूर्यकुमार यादवच्या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधले.

रोहितने या सामन्यात सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला होता. त्याने नंतर 83 चेंडूतच त्याचे शतक पूर्ण केले. त्याने 26 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर फ्रंट फूटवर पुल शॉट खेळला आणि एकेरी धाव काढत त्याचे शतक पूर्ण केले.

त्याने हे शतक पूर्ण करताच भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्येही जल्लोष झाला. भारतीय खेळाडूंनी उभे राहत टाळ्या वाजवून रोहितचे अभिनंदन केले. यावेळी सूर्यकुमारने केलेल्या एका कृतीने लक्ष वेधले. अनेक चाहत्यांनी कयास लावला की सूर्यकुमारने रोहितला द्विशतक करण्याचा इशारा केला होता. रोहितने शतक केल्यानंतरच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओही सध्या व्हायरल होत आहे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे रोहितने याआधीच वनडेत तीन द्विशतके केली आहेत. तो वनडेत सर्वाधिक द्विशतक करणाराही फलंदाज आहे.

तब्बल 1100 दिवसांनी रोहितचे शतक

दरम्यान, रोहितचे हे वनडे क्रिकेटमधील 30 वे शतक आहे. महत्त्वाचे म्हणजे त्याने वनडे क्रिकेटमध्ये तब्बल ३ वर्षांनी शतक झळकावले आहे. यापूर्वी त्याने अखेरचे वनडे शतक १९ जानेवारी 2020 रोजी केले होते. म्हणजेच त्याला 29 व्या वनडे शतकानंतर 30 वे शतक करण्यासाठी तब्बल 1100 दिवसांची प्रतिक्षा करावी लागली.

पाँटिंगची बरोबरी

रोहितने वनडेत आता 30 शतके पूर्ण केल्याने तो सर्वाधिक वनडे शतके करणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही पहिल्या तीन क्रमांकांमध्ये स्थान मिळवले आहे. तो आता ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रिकी पाँटिंगसह संयुक्तरित्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाँटिंगनेही वनडेमध्ये 30 शतके केली आहेत.

या यादीत पहिल्या दोन्ही क्रमांकावर भारतीय क्रिकेटपटू आहेत. पहिल्या क्रमांकावर मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर आहे. त्याने वनडेत 49 शतके केली आहेत. तसेच विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने वनडेत 46 शकते केलेली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT