India vs New Zealand Dainik Gomantak
क्रीडा

India vs New Zealand: वनडेमध्ये कोणाचं वर्चस्व? एका क्लिकवर जाणून घ्या हेड-टू-हेड रेकॉर्ड्स

वनडे क्रिकेटमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघातील सामन्यांत कोण वरचढ ठरले आहे, जाणून घ्या.

Pranali Kodre

India vs New Zealand, ODI Series: भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात बुधवारपासून तीन सामन्यांची वनडे मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार या सामन्याला दुपारी 1.30 वाजता सुरुवात होईल.

दरम्यान, या मालिकेसाठी मैदानात उतरण्यापूर्वी दोन्ही संघांचा आत्मविश्वास वाढलेला आहे. कारण, भारताने नुकताच श्रीलंकेला वनडे मालिकेत 3-0 असा व्हाईटवॉश दिला आहे, तर न्यूझीलंड संघ पाकिस्तानला त्यांच्याच मायदेशात वनडे मालिकेत 2-1 असे पराभूत करून भारत दौऱ्यावर आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना हैदराबादला झाल्यानंतर दुसरा सामना 21 जानेवारीला रायपूरला होणार आहे. त्यानंतर तिसरा सामना इंदोरला 24 जानेवारी रोजी होईल.

अशी आहे आमने-सामने कामगिरी

भारत आणि न्यूझीलंड संघ आत्तापर्यंत वनडे क्रिकेटमध्ये 113 सामन्यांत आमने-सामने आले आहेत. यातील 55 सामने भारताने जिंकले आहेत, तर 50 सामने न्यूझीलंड संघाने जिंकले आहेत. तसेच 7 सामन्यांचा निकाल लागलेला नाही, तर एक सामना बरोबरीत सुटला आहे.

तसेच भारतात झालेल्या सामन्यांचा विचार करायचा झाल्यास भारत आणि न्यूझीलंड संघ 35 वनडे सामन्यांत एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यातील 26 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तसेच न्यूझीलंडने 8 सामन्यांत विजय मिळवले आहेत. तसेच एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.

भारतात याआधी न्यूझीलंडने शेवटची वनडे मालिका 2017 साली खेळली होती. या मालिकेत भारताने 2-1 असा विजय मिळवला होता. तसेच या दोन्ही संघात एकूण शेवटची वनडे मालिका गेल्यावर्षी म्हणजेच नोव्हेंबर 2022 मध्ये झाली होती. या मालिकेत भारताने 1-0 असा विजय मिळवला होता.

वनडे मालिकेचे वेळापत्रक -

18 जानेवारी - पहिला वनडे, हैदराबाद

21 जानेवारी - दुसरा वनडे, रायपूर

24 जानेवारी - तिसरा वनडे, इंदोर

असे आहेत वनडे मालिकेसाठी दोन्ही संघ -

भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ईशान किशन (यष्टीरक्षक), विराट कोहली, रजत पाटीदार, सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

न्यूझीलंड संघ - फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (कर्णधार/यष्टीरक्षक), मायकेल ब्रेसवेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर, ईश सोधी, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर, जेकॉब डफी, डग ब्रेसवेल, मार्क चॅपमन, हेन्री शिपले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Forward Public Outreach Campaign: 'जनसंवादा'साठी विधानसभेपूर्वी मोहीम; ई-मेलद्वारे सहभागी होण्याचे गोवा फॉरवर्ड, काँग्रेसचे आवाहन

Navelim Housing Board Regularisation: नवेवाडेतील 150 घरांच्या नियमितीकरण पत्रांचे वाटप; 'लाभार्थ्यांकडून केवळ 10 हजार रुपये नाममात्र शुल्क आकारले जाईल'

Goa Western Ghats Eco Sensitive Zone: गोवा जैवसंवेदनशील क्षेत्रातून 22 गावे वगळण्याचा प्रस्ताव कमकुवत? केंद्राकडून अतिरिक्त माहितीची मागणी

Tarun Tejpal Acquittal Appeal: तेजपाल प्रकरणात निकाल राखीव उच्च न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद; क्लीन चिट कायम राहणार का?

Goa Tourist Places Fine: पर्यटनस्थळांची वाट लावाल तर खिशातून जातील लाखो रुपये! गोव्यात बेकायदेशीर बीच पार्टी, फेरीवाले आणि दलालांवर 1 लाखांपर्यंत दंडात्‍मक कारवाईचा कडक इशारा

SCROLL FOR NEXT