Team India Dainik Gomantak
क्रीडा

IND vs NZ, 3rd T20I: गिलच्या शतकानंतर बॉलर्सने चढवला विजयी कळस! भारताकडून किवी नेस्तनाभूत, मालिकाही खिशात

भारतीय संघाने न्यूझीलंडला तिसऱ्या टी20 सामन्यात पराभूत करत मालिका खिशात घातली.

Pranali Kodre

India vs New Zealand, 3rd T20I: बुधवारी (1 फेब्रुवारी) भारतीय क्रिकेट संघाने न्यूझीलंडविरुद्धचा टी२० मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना तब्बल 168 धावांनी जिंकला. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या हा सामना जिंकून भारताने तीन सामन्यांची ही टी20 मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली.

या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 235 धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 12.1 षटकात केवळ 66 धावांवरच संपूष्टात आला.

भारताचा सर्वात मोठा विजय

भारतासाठी हा आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमधील धावांच्या तुलनेतील सर्वात मोठा विजय ठरला आहे. विशेष म्हणजे आयसीसीचे पूर्णवेळ सदस्य असलेल्या दोन संघात खेळल्या गेलेल्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यामधील देखील हा सर्वात मोठा विजय ठरला आहे.

तब्बल 8 फलंदाज एक आकडी धावसंख्येवर बाद

न्यूझीलंडने या सामन्यात 235 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या 5 षटकातच 5 विकेट्स गमावल्या होत्या. न्यूझीलंडला सुरुवातीलाच हार्दिक पंड्या आणि अर्शदीप सिंगने मोठे धक्के दिले होते. यातून न्यूझीलंड सावरू शकले नाही. त्यांनी नंतरही नियमित कालांतराने विकेट्स गमावल्या.

न्यूझीलंडकडून केवळ डॅरिल मिशेलला 30 धावांचा टप्पा पार करता आला. त्याने 35 धावांची खेळी केली. तसेच कर्णधार मिशेल सँटेनरने 13 धावांची खेळी केली. या दोघांव्यतिरिक्त न्यूझीलंडकडून कोणीही दोन आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. न्यूझीलंडचे 8 खेळाडू एकआकडी धावसंख्येवर बाद झाले. त्यामुळे न्यूझीलंडला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

भारताकडून कर्णधार हार्दिक पंड्याने 4 विकेट्स घेतल्या. त्याच्याव्यतिरिक्त अर्शदीप सिंग, उमरान मलिक आणि शिवम मावी यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

भारताच्या 234 धावा

तत्पूर्वी, या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पण भारताची सुरुवात खास झाली नाही. भारताने सलामीवीर ईशान किशनची विकेट 1 धावेवरच गमावली. पण असे असले तरी शुभमन गिलने त्याचा आक्रमक खेळ सुरू ठेवत 54 चेंडूत शतक पूर्ण केले.

त्याने ईशान बाद झाल्यावर राहुल त्रिपाठीबरोबर दुसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 80 धावांची भागीदारी केली. राहुल त्रिपाठीने आक्रमक खेळ केला. त्यामुळे दुसऱ्या बाजूने त्याला गिलने चांगली साथ दिली. पण त्रिपाठी 22 चेंडूत 44 धावांची खेळी करून बाद झाला.

त्यानंतर सूर्यकुमार यादवही 24 धावा करून बाद झाला. पण नंतर हार्दिकला साथीला घेत गिलने धावगती वाढवत अनेक आक्रमक फटके मारले. त्याने हार्दिकबरोबर 103 धावांची भागीदारी केली, ज्या भागीदारीत गिलचा 71 धावांचा वाटा होता. हार्दिक 30 धावा करून अखेरच्या षटकात बाद झाला.

पण गिल अखेरपर्यंत नाबाद राहिला. त्याने 12 चौकार आणि 7 षटकारांसह 63 चेंडूत 126 धावांची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीच्या जोरावर भारताने 20 षटकात 4 बाद 234 धावा उभारल्या. न्यूझीलंडकडून डॅरिल मिशेल, ईश सोधी, ब्लेअर टिकनर आणि मायकल ब्रेसवेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

FDA Raid: गणेश चतुर्थीपूर्वी 'एफडीए'ची मोठी कारवाई! मडगाव, केपे, धारबांदोड्यात तब्बल 430 किलो अन्नसाठा नष्ट

8th Pay Commission: '68,000 किमान वेतन आणि जुनी पेन्शन हवीच!' चंदीगड बैठकीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांनी मांडल्या मोठ्या मागण्या; काय घेणार सरकार निर्णय?

Goa Police Reshuffle: गोवा पोलिस दलात मोठे फेरबदल! IPS अधिकाऱ्यांसह 12 पोलिस निरीक्षकांच्या बदल्या; दक्षिण गोवा एसपीपदी अक्षत आयुष

Mazi Bus Scheme: खासगी बसचालकांसाठी खुशखबर! 'माझी बस' योजनेत किलोमीटरमागे 5 रुपये अनुदान; जुन्या बस बदलण्यासाठी 10 लाखांपर्यंत मदत

Congo School Fire: कांगो हादरले! दोन शाळांमध्ये भीषण अग्निकांड, 26 विद्यार्थ्यांचा मृत्यू; थरकाप उडवणारा VIDEO समोर

SCROLL FOR NEXT