Jonny Bairstow  Dainik Gomantak
क्रीडा

IND vs ENG 5th Test: जॉनी बेअरस्टोचा 100व्या कसोटी सामन्यात मोठा पराक्रम; धरमशाला कसोटी ठरली खास

IND vs ENG 5th Test: धरमशाला मैदानावर मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत.

Manish Jadhav

IND vs ENG 5th Test: धरमशाला मैदानावर मालिकेतील शेवटच्या कसोटी सामन्यात भारत आणि इंग्लंड संघ आमनेसामने आहेत. इंग्लंडचा तूफानी फलंदाज जॉनी बेअरस्टोसाठी हा कसोटी सामना खूप खास आहे. जॉनी बेअरस्टो धरमशाला येथे 100 वा कसोटी सामना खेळत आहे. जॉनी बेअरस्टोने आपल्या 100व्या कसोटी सामन्यातही मोठी कामगिरी केली. सामन्याच्या पहिल्या डावात 26 धावा करताच बेअरस्टोने ही कामगिरी केली.

कसोटी क्रिकेटमध्ये बेअरस्टोचा कारनामा

दरम्यान, धरमशाला कसोटी सामन्यातील पहिल्या डावात जॉनी बेअरस्टो पुन्हा एकदा फ्लॉप ठरला. पहिल्या डावात केवळ 29 धावा करुन जॉनी बाद झाला. पण जॉनीने पहिल्या डावात 26 धावा करताच कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) त्याच्या नावावर एक खास कामगिरी नोंदवली गेली. खरे तर, धरमशाला कसोटीच्या पहिल्या डावात 26 धावा केल्यानंतर जॉनी बेअरस्टोने कसोटी क्रिकेटमध्ये 6 हजार धावा पूर्ण केल्या. अशाप्रकारे जॉनी बेअरस्टोने आपल्या 100व्या आंतरराष्ट्रीय कसोटी सामन्यात हा पराक्रम केला.

बेन स्टोक्सने टॉस जिंकला होता

दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळेल, असे बोलले जात होते. पण भारतीय फिरकीपटूंनी ते चुकीचे ठरवले. लंचपर्यंत इंग्लंडची धावसंख्या 2 बाद 100 धावा होती. त्यानंतर टीब्रेकपर्यंत इंग्लंडने (England) 8 गडी गमावून 194 धावा केल्या होत्या. दुसऱ्या सेशनमध्ये इंग्लिश संघाच्या सहा विकेट पडल्या. त्यापैकी कुलदीपला तीन, अश्विनला दोन आणि जडेजाला एक विकेट मिळाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT