Rohit Sharma Dainik Gomantak
क्रीडा

IND vs AUS: 'हिटमॅन'ला मोठ्या विक्रमाची संधी! धोनी, अझरला मागे टाकत गावसकरांची करू शकतो बरोबरी

India vs Australia: भारताचा कर्णधार रोहित शर्माला अहमदाबाद कसोटीदरम्यान मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma record: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात गुरुवारपासून कसोटी मालिकेतील चौथा सामना सुरू होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार रोहित शर्माला मोठा विक्रम करण्याची संधी आहे.

रोहितने जर या सामन्यात शतकी खेळी करण्यात यश मिळवले, तर तो कर्णधार म्हणून एमएस धोनी, कपिल देव सारख्या खेळाडूंनाही मागे टाकेल. रोहितने यापूर्वी याच चालू कसोटी मालिकेतील पहिल्या कसोटीत शतक केले होते.

त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात कसोटी शतक करणारा 6 वा भारतीय कर्णधार ठरला होता. त्यामुळे आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतात सर्वाधिक कसोटी शतक करण्याच्या सुनील गावसकरांच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो. गावसकरांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कर्णधार म्हणून मायदेशात 2 कसोटी शतके केली आहे.

या यादीत गावसकरांच्या पाठोपाठ सध्या दुसऱ्या क्रमांकावर एका शतकासह रोहित शर्मा, एमएस धोनी, मोहम्मद अझरुद्दीन, कपिल देव आणि मंसूर अली खान पतौडी हे खेळाडू आहेत. त्यामुळे रोहितने जर अहमदाबादला शतक केले, तर तो या यादीत बाकी कर्णधारांना मागे टाकेल.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात सर्वाधिक शतके करणारे भारतीय कर्णधार

2 - सुनील गावसकर

1 - रोहित शर्मा

1 - एमएस धोनी

1 - मोहम्मद अझरुद्दीन

1 - कपिल देव

1 - मंसूर अली खान पतौडी

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी शतके करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत ४ शतकांसह विराट कोहली अव्वल क्रमांकावर आहे. महत्त्वाचे म्हणजे विराटने ही चारही शतके भारताबाहेर केली आहेत.

या यादीत विराट पाठोपाठ मोहम्मद अझरुद्दीन (2), सुनील गावसकर (2), कपिल देव (1), एमएस धोनी (1), सौरव गांगुली (1), मंसूर अली खान पतौडी (1), अजिंक्य रहाणे (1), रोहित शर्मा (1) आणि सचिन तेंडुलकर (1) हे आहेत.

सर्वाधिक धावा करण्यात धोनी अव्वल

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत धोनी अव्वल क्रमांकावर आहे. त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 8 सामन्यांमध्ये 643 धावा केल्या आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पतौडींच्या नावावर 490 धावा आहेत. तर त्यापाठोपाठ सुनील गावसकर (425), मोहम्मद अझरुद्दीन (311) आणि रोहित शर्मा (207) हे आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'झुरळ' शब्दाने भडकवला बेरोजगारांचा वणवा! 'कॉक्रोच जनता पार्टी'ने हादरवली दिल्ली

फेब्रुवारीतील इशारा ऐकला असता तर... सरकारवर नामुष्कीची आणि लाखो मुलांच्या जीव टांगणीला लागण्याची वेळ आली नसती; CBSE चा 'महा'घोटाळा चव्हाट्यावर!

Goa ST Reservation: गावडा, कुणबी आणि वेळीप समाजाचे डोळे दिल्लीकडे, गोव्यात आरक्षणाचा सर्वात मोठा सस्पेन्स; अमित शहा आठवडाभरात भूमिका करणार स्पष्ट?

Coal Exchange Rules 2026: मुरगाव बंदराबाबत सर्वात मोठी बातमी! केंद्र सरकारच्या 'या' निर्णयामुळे कोळसा व्यापाराला मिळणार गती

Diksha Parwadkar Accident: दीक्षा पारवडकर मृत्यू प्रकरणात नवा खळबळजनक ट्विस्ट! परवाना निलंबित तरीही गोव्यात आलिशान गाड्यांची विक्री सुरुच!

SCROLL FOR NEXT